Nana Patole On NCP: आम्हाला उघड शत्रू हवा, छुपा नाही; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्लाबोल

आम्हाला भाजपसारखा उघड शत्रू परवडतो. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस जी व्यवस्था निर्माण करत आहे ते फार धोकादायक आहे, अशी टीका काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली आहे.

Nana Patole | (Photo Credits: twitter)

राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आमच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम करते आहे. आम्हाला भाजपसारखा उघड शत्रू परवडतो. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस जी व्यवस्था निर्माण करत आहे ते फार धोकादायक आहे, अशी टीका काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली आहे. गोंदिया येथे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी नाना पटोले यांना धक्का देत भाजपच्या मदतीने जिल्हा परिषदेवर झेंडा फडकवला. त्यानंतर नाना पटोले प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

भंडारा गोंदिया या दोन्ही ठिकाणी जिल्हा परिषद अध्यक्ष पदावेळी जोरदार रस्सीखेच पाहायला मिळाली. भंडारा जिल्हा परिषदेत नाना पटोले यांनी भाजपच्या नाराज गटाशी हातमिळवणी करत सत्ता मिळवली. तर गोंदिया इथे महाविकासआघाडीत असतानाही राष्ट्रवादीने थेट काँग्रेसलाच हात दाखवला. गोंदियात राष्ट्रवादीने भाजपच्या मदतीने सत्ता मिळवली. (हेही वाचा, Nana Patole On MNS: भाजप राज ठाकरेंचा कठपुतळी म्हणून वापर करत आहे, नाना पटोलेंचे वक्तव्य)

ट्विट

गोंदियामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या खेळीबद्दल नाराजी व्यक्त करत नाना पटोले म्हणाले की, आम्हाला नेहमी उघड शत्रू परवडतो. पण राष्ट्रवादी मात्र नेहमी सोबत राऊन पाठीत खंजीर खूपसते. पाठिमागील काही काळात आमच्या अनेक विद्यमान नगरसेवकांना फोडून त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश घडवून आणला. भिवंडीत तर 19 नगरसेवकांना फोडून सत्ता मिळवली. महाविकासआघाडी स्थापन करताना किमान समान कार्यक्रम डोळ्यासमोर ठेऊनच सरकार स्थापन केले आहे. असे असतानाही अशा प्रकारे व्यवस्था केली जात आहे. याबाबत आपण लवकरच हायकमांडशी बोलणार असल्याचेही नाना पटोले म्हणाले.