Lok Sabha Election 2019: भाजपाच्या तिकीटावर उभे असलेल्या सुजय विखे पाटीलच्या प्रचारासाठी कॉंग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील उतरले मैदानात

हे मतदान 23 एप्रिल दिवशी होणार असून मतमोजणी 23 मे ला होणार आहे.

राधाकृष्ण विखे पाटील (फोटो सौजन्य-फेसबुक)

Ahmednagar Lok Sabha Constituency: महाराष्ट्रात कॉंग्रेस (Maharashtra Congress) पक्षाला धक्का देत अहमदनगरमध्ये राधाकृष्ण विखे पाटील (RadhaKrish Vikhe Patil)  यांचा मुलगा डॉ. सुजय विखे पाटील (Dr. Sujay Vikhe Patil) यांनी भाजपामध्ये प्रवेश मिळवला. त्यानंतर भाजपाकडे सुजयला तिकीटही जाहीर करण्यात आले. मात्र राधाकृष्ण विखे पुढे काय करणार? असा प्रश्न होता. मात्र अद्याप भाजपात (BJP) प्रवेश केला नसला तरीही राधाकृष्ण विखे पाटील भाजपाच्या तिकीटावर उभे असलेल्या सुजय विखेंचा प्रचार करणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

मंगळवारी सुजय विखेंच्या प्रचारादरम्यान राहुरी या अहमदनगरच्या शहराच्या बाहेर एका प्रचार सभेमध्ये राधाकृष्ण विखे पाटील सुजयसाठी मत मागत असल्याचं समोर आलं आहे. एनडीटीव्हीने अशाप्रकारचे वृत्त दिले आहे. मात्र या सभेसाठी मीडियाला आमंत्रण नसल्याने चित्रीकरण थांबवण्याचे आदेश दिल्याचेही सांगण्यात आले आहे. राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या भाजपप्रवेशाच्या बातम्या या अफवा, ते कॉंग्रेसमध्येच राहणार: सुजय विखे-पाटील

एका पत्रकाराने राधाकृष्ण विखे पाटीलांना तुम्ही कॉंग्रेससोबत बंडखोरी करणार का? असा प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी आपण कॉंग्रेससोबतच असल्याचा पुनरूच्चार केला आहे. मुलाच्या प्रचारासाठी मत मागण्यासाठी मी पक्षाकडून परवानगी घेतली असल्याची माहितीदेखील दिली आहे.

राधाकृष्ण विखे पाटील हे महाराष्ट्राच्या विधानसभेत विरोधी पक्ष नेते आहेत. सुजय विखेंनंतर राधाकृष्ण विखेपाटील देखील भाजपाच्या वाटेवर जाणार असा अनेकांनी अंदाज बांधला होता मात्र सुजय विखेंचा भाजप प्रवेश हा त्यांचा वैयक्तिक निर्णय असल्याचं सांगण्यात आले आहे.

अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून संग्राम जगताप विरूद्ध सुजय विखे पाटील असा संघर्ष रंगणार आहे. हे मतदान 23 एप्रिल दिवशी होणार असून मतमोजणी 23 मे ला होणार आहे.



संबंधित बातम्या

IND-W vs WI-W 2nd T20I 2024 Preview: वेस्ट इंडिजला दुसऱ्या T20 मध्ये पुनरागमन करणार, की भारतीय महिला मालिका जिंकणार, सामन्यापूर्वी जाणून घ्या दोन्ही संघाचे हेड टू हेड रेकॉर्ड, मिनी लढाई, स्ट्रीमिंग यासह सर्व तपशील

IND W Beat WI W 1st T20I Match Scorecard: पहिल्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने वेस्ट इंडिजचा 49 धावांनी केला पराभव, तीतास साधूची प्राणघातक गोलंदाजी

Delhi Assembly Election 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आपने जाहीर केली 38 उमेदवारांची यादी; अरविंद केजरीवाल आणि आतिशी कोठून निवडणूक लढवणार? वाचा

Parliament Winter Session: अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला करण्यासाठी काँग्रेस परिवाराने संविधान बदलले; पंतप्रधान मोदींचा लोकसभेत काँग्रेसवर जोरदार निशाणा