Kunal Kamra: प्रसिद्ध कॉमेडीयन कुनाल कामरा यांच्याविरुद्ध खटला चालविण्यास अॅटर्नी जनरल के. के. वेणूगोपाल यांची मान्यता
न्यायालयाच्या या निर्णयाबाबत कामरा यांनी एक ट्विट केले होते. कामरा यांनी केलेल्या ट्विटमुळे न्यायालयाचा अवमान झाल्याचे मत व्यक्त करत अॅटर्नी जनरल के के वेणुगोपाल यांनी व्यक्त केले.
प्रसिद्ध कॉमेडीयन कुनाल कामरा (Comedian Kunal Kamra) याच्याविरोधात खटला चालविण्यास भारताचे अॅटर्नी जनरल के. के. वेणूगोपाल (AG of India K K Venugopal ) यांनी परवानगी दिली आहे. कुनाल कामरा (Kunal Kamra)) यांनी सर्वोच्च न्यायालयाबाबत केलेल्या एका वक्तव्यामुळे त्यांच्यावर आक्षेप घेण्या आला होता. कामरा यांच्या वक्तव्यावरुन न्यायालय अवमान प्रकरणी खटला चालवावा अशी मागणी करण्यात आली होती. मुंबई उच्च न्यायालयात प्रॅक्टिस करणारे वकील अभिषेक रासकर आणि विधीचे विद्यार्थी श्रीरंग कातनेश्वरकर यांनी यासदंर्भात अॅटर्नी जनरल यांना पत्र लिहिले होते.
रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्नब गोस्वामी यांना अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला. न्यायालयाच्या या निर्णयाबाबत कामरा यांनी एक ट्विट केले होते. कामरा यांनी केलेल्या ट्विटमुळे न्यायालयाचा अवमान झाल्याचे मत व्यक्त करत अॅटर्नी जनरल के के वेणुगोपाल यांनी व्यक्त केले. के के वेणुगोपाल यांनी आपल्या पत्रामध्ये कुनाल कामरा यांच्या काही ट्विट्सचा उल्लेख केला आहे.
कामरा यांनी ट्विटर हँडलवरुन ट्विट केले होते. त्याचा आशय असा की,, 'सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीतून सन्मान हा केव्हाच निघून गेला आहे. या देशचे सर्वोच्च न्यायालय देशाचे सुप्रीम जो बनले आहे.' (हेही वाचा, Anvay Naik Suicide Case: त्या वेळी किरीट सोमय्या यांची बोबडी वळली होती का? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील आरोपांवर अन्वय नाईक यांच्या कुटुंबीयांचे प्रत्युत्तर)
अन्वय नाईक या वास्तूरचनाकाराने 2018 मध्ये आत्महत्या केली होती. रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या स्टुडीओची रचना अन्वय नाईक यांनी केली होती. या कामाचे बरेचसे पैसे अर्णब गोस्वामी यांनी थकवल्याचे सांगत नाईक यांनी आत्महत्या केली. नाईक यांच्या सुसाईड नोटमध्येही तसा उल्लेख होता. या प्रकरणातच रायगड पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना अटक केली. सध्या ते जामीनवर बाहेर आहेत.