Buldhana Accident: कंझारा फाट्याजवळ दुचाकींच्या धडकेत भीषण अपघात, दोघांचा मृत्यू
बुलढाण्यात एका भरधाव कारने धडक दिल्याने तीन महिलांचा अपघातात मृत्यू झाला ही घटना ताजी असताना बुलढाण्यातीली कंझारा फाट्याजवळ दुचाकीच्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला
Buldhana Accident: बुलढाण्यात एका भरधाव कारने धडक दिल्याने तीन महिलांचा अपघातात मृत्यू झाला ही घटना ताजी असताना बुलढाण्यातीली कंझारा फाट्याजवळ दुचाकीच्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला. रविवारी रात्री बुलढाण्यातील खामगाव गावातील कंझारा फाट्याजवळ दोन दुचाकी समोरासमोर येऊन धडकल्या. या अपघातात दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली. बुलढाणा पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाणा खामगाव कंझारा फाट्यावर दोन दुचाकीस्वारांचा भीषण धडक झाली. या घटनेत दोन जण जागीच ठार झाले. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर घटनास्थळाचा पंचनामा केला. दोन्ही मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर जवळच्या शासकिय रुग्णलयात पाठवण्यात आला. डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरिफैल भागातील किशोर कवठेकर आणि गेरू माटरगाव येथील सुरेश चव्हाण यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी घटनेअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या अपघाची माहिती मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना दिली आहे. या घटनेनंतर परिसरात मोठी शांतता पसरली आहे. बुलढाण्यात रस्त्ये अपघात वाढत चालले आहे. घटनास्थळावरून दोन्हा बाईक पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
(The above story first appeared on LatestLY on Nov 06, 2023 11:42 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

