IPL Auction 2025 Live

CNG-PNG Price Hike: महागाईचा झटका, सीएनजी, पीएनजी दरात अनुक्रमे चार आणि तीन रुपयांची वाढ

दरवाढीबाबत सांगताना महानगर गॅस लिमिटेडने (MGL) म्हटले आहे की, स्थानिक पातळीवर गॅसच्या सप्लायमध्ये कमतरता निर्माण झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

CNG-PNG Price Hike (File Image)

पेट्रोल,डिझेल (Petrol, Diesel) असो किंवा घरगुती गॅस असो सर्वांच्याच किमती वाढल्यामुळे आगोदरच मेटाकुटीला आलेल्या नागरिकांना पुन्हा एकदा झटका बसला आहे. आता सीएनजी-पीएनजी (CNG-PNG) दरात वाढ झाली आहे. महानगर गॅस लिमिटेडने (MGL) हा निर्णय घेतला असून सीएनजी, पीएनजी दरात अनुक्रमे चार आणि तिन रुपयांची वाढ (CNG-PNG Price Hike) झाली आहे. त्यामुळे तीन रुपये वाढिसह सीएनजी प्रति किलो 80 रुपये तर चार रुपये वाढीसह पीएनजी 48.50 रुपये प्रति किलो दराने ग्राहकांना खरेदी (CNG, PNG Price Increases) करावा लागणार आहे. दरवाढीबाबत सांगताना महानगर गॅस लिमिटेडने (MGL) म्हटले आहे की, स्थानिक पातळीवर गॅसच्या सप्लायमध्ये कमतरता निर्माण झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. आज (12 जुलै) मध्यरात्रीपासून हे दर लागू होणार आहेत.

महानगर गॅस लिमिटेडने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, देशात गॅसच्या किमती वाढल्या आहेत. त्याचा परीणाम एमजीए उत्पदनांवर मोठ्या प्रमाणावर होत आहे. परिणामी सीएनजी-पीएनजी दरांमध्ये वाढ करण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, यापूर्वी 29 एप्रिल रोजी सीएनजी दरात वाढ करण्या आली होती. त्याही वेळी सीएनजी चार रुपयांनी वाढविण्यात आला होता. त्यानंतर आता अवघ्या एकदोन महिन्यांमध्येच सीएनजी दरात वाढ करण्यात आली आहे. महागाईने आगोदरच नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. त्यातच आता पुन्हा ही दरवाढ करम्यात आल्याने सामान्यांच्या खिशावरचा भार आता आणखीच वाढला आहे.