Lockdown in Maharashtra: राज्यातील वाढत्या रुग्णसंख्येवर लॉकडाऊन चा पर्याय? पहा काय म्हणाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात लॉकडाऊन लागू होणार का? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

CM Uddhav Thackeray (Photo Credits: ANI)

राज्यातील कोरोना बाधितांच्या संख्या पुन्हा मोठ्या प्रमाणावर वाढू लागल्याने राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात लॉकडाऊन लागू होणार का? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. त्याचबरोबर यापूर्वी अनेकदा लॉकडाऊनचा इशारा मुख्यमंत्र्यांकडूनही देण्यात आला आहे. दरम्यान, राज्यातील वाढत्या रुग्णसंख्येवर लॉकडाऊन चा पर्याय असेल का? या सर्वसामान्यांना पडलेल्या प्रश्नावर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) नेमके काय म्हणाले जाणून घेऊया...

"राज्यात कोरोनाचा धोका पुन्हा वाढला आहे. मागील सप्टेंबर महिन्यातील उच्चांक कोरोना रुग्णसंख्येने ओलांडला आहे. ही चिंतेची बाब आहे. या परिस्थितीत लॉकडाऊन करणं हा पर्याय आहे. परंतु, लगेचच लॉकडाऊन लावण्यात येणार नाही. आता लोक मास्क वापरु लागले आहेत. लोकांकडून अशाच सहकार्याची मला अपेक्षा आहे. नागरिकांनी नियमांचे  न पालन केल्यास लवकरच कठोर निर्णय घ्यावा लागेल," असे मुख्यमंत्री म्हणाले. आज मुख्यमंत्री नाशिक, नंदुरबार दौऱ्यावर आहेत. तेथील लसीकरण केंद्रांचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

ANI Tweet:

तसंच लस पूर्णपणे सुरक्षित असून लस घेण्याचेही आवाहनही त्यांनी जनतेला केले. दरम्यान, परदेशातला विषाणूचा स्ट्रेन महाराष्ट्रात अद्याप आढळलेला नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. (Maharashtra COVID 19 Fresh Guidelines: वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारची नवी नियमावली; पहा 31 मार्च पर्यंत कोणत्या गोष्टींवर निर्बंध)

कालच्या अपडेटनुसार, राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा 23,96,340 इतका झाला आहे. तर 53,138 मृतांची नोंद झाली आहे. 21,75,565 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून 1,66,353 सक्रीय रुग्ण आहेत. यात दिवसेंदिवस मोठी भर पडत आहे.