देवेंद्र फडणवीस यांनी 'मुंबई काही मिनिटात' म्हणत शेअर केली Mumbai Metro Project ची खास झलक; अमिताभ बच्चन यांचा सहभाग 'या' कारणाने ठरला चर्चेचा विषय (Watch Video)
देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वरून नुकताच 'मुंबई काही मिनिटात' हा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओ मध्ये सामान्य मुंबईकर ट्रॅफिकच्या गर्दीत आपलं आयुष्य कसे घालवतात हे पाहायला मिळत आहेत. मात्र यापुढे गर्दीत घालवलेले क्षण आपल्याला परत मिळतील अशा आशयचा हा व्हिडीओ आहे. यामध्ये अमिताभ बच्चन यांचा सहभाग हा चर्चेचा विषय ठरत आहे.
मुंबईच्या ट्रेन मध्ये गर्दी आणि रस्त्यावर ट्राफिक अशा अवस्थेत अनेकदा आपले अनेक बहुमूल्य क्षण हरवून जातात, पण आता यापुढे अशी समस्या येणार नाही कारण आता मुंबई मेट्रो (Mumbai Metro) काही मिनिटात तुम्हाला तुमच्या गंतव्य स्थानी पोहचवून प्रवासाची दगदग वाचवेल असा दावा करणारा एक व्हिडीओ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी नुकताच आपल्या ट्विटर हॅण्डल वरून शेअर केला आहे. या व्हिडीओचे नावच मुंबई काही मिनिटात असे आहे. या व्हिडीओ मध्ये अमिताभ बच्चन यांचा सहभाग चर्चेचा विषय ठरत आहे. जेव्हा मुंबई मेट्रोच्या प्रकल्पाची घोषणा झाली होती तेव्हा अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याचे नाव देखील मेट्रोच्या बांधकाम परिसरात येणार होते. मात्र काही काळाने हा बंगला मेट्रो मार्गातून वगळण्यात आला. यावेळी बिग बी यांनी मेट्रो ही आपल्या प्रायव्हसीचा बाधा पोहचवत आहे असेही म्हंटले होते पण आता त्यांनी आपल्या विधानावरून घुमजाव केल्याने नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगत आहेत.
देवेंद्र फडणवीस यांनी शेअर केलेल्या व्हिडीओ मध्ये सामान्य मुंबईकर ट्रॅफिकच्या गर्दीत आपलं आयुष्य कसे घालवतात हे पाहायला मिळत आहेत. मात्र यापुढे गर्दीत घालवलेले क्षण आपल्याला परत मिळतील अशा आशयचा हा व्हिडीओ आहे. या जाहिरातीत अमिताभ बच्चन यांचा सहभाग हा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. (Mumbai Metro Cashless Travel: आता मेट्रोचे तिकीट मिळणार डेबिट-क्रेडीट कार्डद्वारे; आजपासून अंमलबजावणी)
पहा मुंबई काही मिनिटात ची एक झलक..
दरम्यान, मुंबईकरांचा प्रवासाचा ताण हलका करण्यासाठी मुंबईभर मेट्रोचे जाळे प्रस्थपित करण्याचे काम अतिशय वेगाने सुरु आहे. अलीकडेच मुंबई मेट्रो 3 च्या डब्ब्यांचे फडणवीस यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले होते तर दुसरीकडे नवी मुंबईत ही मेट्रो चाचणीला सुरुवात झाली आहे. या मेट्रोच्या उभारणीनानंतर मुंबईकर प्रवासात न अडकता आपले क्षण साजरे करू शकतात अशी सुचिन्हे या व्हिडिओमार्फत दाखवण्यात आली आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)