महालक्ष्मी एक्सप्रेस मध्ये अडकलेल्या प्रवाशांच्या बचावकार्यात जातीने लक्ष द्या; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिवांना निर्देश

महालक्ष्मी एक्सप्रेस मध्ये अडकलेल्या पप्रवाशांच्या सुटकेसाठी एनडीआरएफची चार पथके बचावकार्य पार पाडत आहेत. आतापर्यँत यामध्ये 550 जणांची सुटका करण्यात यश आलेले आहे, या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्य सचिवांना सुद्धा जातीने लक्ष घालण्याचे निर्देश दिले आहेत.

CM Devendra Fadnavis Speaking On Mahalaxmi Express Incident (Photo Credits: Twitter, File Image)

राज्यात पावसाने घातलेल्या थैमानामुळे उल्हास नदीला(Ulhas River)  पूर येऊन आसपासच्या परिसरात पुराचे पाणी  शिरल्याचे समजत आहे. वांगणी (Vangani) आणि बदलापूर (Badlapur) स्थानकाच्या दरम्यान रेल्वे रुळावर सुद्धा या पुराच्या पाण्याचा शिरकाव होऊन साधारण गुडघाभर पाणी साचले होते. यामुळे काल रात्रीपासून या स्थानकाच्या मध्येच कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्सप्रेसची (Mahalaxmi Express)  वाहतूक विस्कळीत झाली होती. रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार यामध्ये तब्बल 2000  प्रवासी अडकून पडले होते ,त्यांच्या सुटकेसाठी एनडीआरएफ व आरपीएफ चे पथक कालपासून कार्यरत होते. या प्रकरणी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी मुख्य सचिवांना सुद्धा जातीने लक्ष घालण्याचे निर्देश दिले आहेत.

CMO ट्विट

एनडीआरएफची चार पथके घटनास्थळी कार्यरत असून,आठ बोटाच्या मदतीने अडकलेल्या प्रवाशांना सुखरूप बाहेर आणण्याचे प्रयत्न करत आहेत.आतापर्यंत या बचावकार्यात एकूण 550 जणांची सुटका अरण्यात य पंथाला यश लाभले आहे. ट्रेनच्या डब्ब्यात अडकलेल्या प्रवाशांना रेल्वे पोलीस व प्रशासनाकडून कालपासून खाण्यापिण्याचे पदार्थ पुरवून धीर दिला जात होता , तसेच या कामात मदत कारण्यासाठे अनेक सामाजिक संस्थांना देखील आवाहन करण्यात आले होते .(मुंबईतील पावसाचे लाईव्ह अपडेट्स पाहण्यासाठी येथे क्लिक करा.)

दरम्यान, मुंबईतील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर सध्या ओसरला आहे, मात्र हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या दोन तीन दिवसात पाऊस कायम राहणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. तसेच वाहतूक व्यवस्था पुर्वव्रत होण्यास अजून काही वेळ लागणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now