सुषमा स्वराज यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी यांनी ट्विटरवरुन व्यक्त केल्या भावना

सुषमा स्वराज यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळात शोककळा पसरली असून भारतीय जनता देखील हळहळ व्यक्त करत आहे.

CM Devendra Fadnavis on Sushma Swaraj Death (Archived, edited, Representative Images)

माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज (Sushma Swaraj) यांचे काल (6 ऑगस्ट) रात्री हृदयविकाराच्या झटक्याने दिल्लीतील AIIMS रुग्णालयात निधन झाले. सुषमा स्वराज यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळात शोककळा पसरली असून भारतीय जनता देखील हळहळ व्यक्त करत आहे. यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना ट्विटरवर व्यक्त केल्या आहेत. (भारताच्या माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्यावर आज दुपारी 3 वाजता होणार अंत्यसंस्कार)

"भयंकर मोठा धक्का! सुषमा स्वराज यांच्या जाण्याने भारताचे मोठे नुकसान झाले आहे. त्या उत्तम लीडर आणि उत्कृष्ट वक्त्या होत्या. राष्ट्रवादाच्या पुरस्कर्त्या होत्या. त्याचबरोबर भाजपच्या अतिशय नम्र आणि प्रामाणिक नेत्या होत्या. त्यांचे जाणे हे माझे वैयक्तिक नुकसान आहे," अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ट्विट:

तर सुषमा स्वराज या मला मोठ्या बहिणीप्रमाणे होत्या असे उद्गार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काढले आहेत. माझी प्रकृती ठीक नसताना त्या डॉक्टरांना माझ्या घरी घेऊन आल्या होत्या. पक्षात असताना त्यांनी मला मोठ्या बहिणीप्रमाणे मार्गदर्शन केले. तसंच प्रेम आणि माया दिली. परराष्ट्र मंत्री म्हणून त्यांनी देशाचा सन्मान जगभरात वाढविला. त्यांनी जो मार्ग आम्हाला दाखविला त्या मार्गाने आम्ही पुढे जाऊ. स्वराज यांचे निधन संघटना, देश आणि माझे वैयक्तिक नुकसान असल्याची प्रतिक्रीया नितीन गडकरी यांनी दिली आहे.

नितीन गडकरी यांनी व्यक्त केल्या भावना:

मागील काही काळापासून सुषमा स्वराज या आजारी होत्या. त्यामुळे त्यांनी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेत आपल्याला कोणतेही मंत्रीपद देऊ नका, अशी त्यांनी मोदींना विनंती देखील केली होती.