Chhatrapati Sambhaji Nagar Video: रुग्णालयात दोन गटांत हाणामारी, हल्लेत महिला डॉक्टर गंभीर, घटना सीसीटीव्हीत कैद

या रुग्णालयातील पेसेंटच्या दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याचे समोर आले आहे. या घटनेचा व्हिडिओ कॅमेरात कैद झाले आहे. क्षुल्लक कारणांवरून दोन गटात मारामारी झाली.

Chhatrapti Sambhaji Nagar

Chhatrapati Sambhaji Nagar Video: छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. या रुग्णालयातील पेसेंटच्या दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याचे समोर आले आहे. या घटनेचा व्हिडिओ कॅमेरात कैद झाले आहे. क्षुल्लक कारणांवरून दोन गटात मारामारी झाली. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, घटनास्थळी महाराष्ट्र सुरक्षा दलाचे चार जवान देखील होते. तरीही हे भांडण टोकाला गेले.  या घटनेत गटातील सदस्यांनी रागाच्या भरात महिला डॉक्टरांवर हल्ला केला आहे. (हेही वाचा-  पैशावरुन वाद, मजूराचे डोळे फोडले; पाचशे रुपयांसाठी गळा चिरून हत्या)

मिळालेल्या माहितीनुसार,या मारामारीच्या घटनेत एक पुरुष जखमी झाला तर महिला डॉक्टरच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. सुरुवातीला त्यांच्या क्षुल्लक कारणांवरून वाद झाला होता त्यानंतर वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. दोन्ही गटांकडून फ्री स्टाईल मारामारी सुरु होती. ही घटना संपुर्ण सीसीटीव्हीत कैद झाली. या घटनेत निष्पाप महिला डॉक्टरांना जब्बर मार लागला आहे. डॉक्टरांच्या डोक्यात रॉड लागल्याची माहिती मिळाली आहे.

रुग्णालयाचे डीन डॉ, शिवाजी सुक्रे यांनी माध्यमांना सांगितले की, या हाणामारी प्रकरणाती दोषींवर योग्य ती कारवाई केली जाणार. याप्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी झालीच पाहिजे अशी माहिती देखील सुप्रिया ताई सुळे यांनी दिली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement