Christmas/New Year Special Trains 2019: नाताळ आणि नवीन वर्षानिमित्त मध्य रेल्वे चालवणार 43 हिवाळी विशेष गाड्या

नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी आणि नाताळता आनंद घेण्यासाठी कोकणात तसेच गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे प्रशासनाने 43 विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

भारतीय रेल्वे (File Photo)

Christmas/New Year Special Trains 2019:  नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी आणि नाताळता आनंद घेण्यासाठी कोकणात तसेच गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे प्रशासनाने 43 विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष रेल्वे गाड्या लोकमान्य टिळक टर्मिनस, पनवेल ते करमळीदरम्यान चालविण्यात येणार आहेत. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आणि पर्यटकांना दिलासा मिळणार आहे. प्रत्येक वर्षी नाताळ तसेच नवीन वर्षानिमित्त लोक कोकणात पर्यटनासाठी जात असतात. कमी रेल्वे गाड्यांमुळे या प्रवाशांचे प्रचंड हाल होतात. त्यामुळे मध्य रेल्वेने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. (हेही वाचा - रेल्वे तिकीट आरक्षणासाठी नियमात बदल, जाणून घ्या कोणत्या गोष्टीसाठी किती रुपये स्विकारणार)

यात लोकमान्य टिळक टर्मिनस-करमळी स्पेशल ट्रेनच्या 14 फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. यासाठी प्रत्येक शुक्रवारी रात्री 1 वाजून 10 मिनिटांनी 01045 क्रमांकाची ट्रेन सुटणार आहे. तसेच परतीच्या प्रवासासाठी 01046 ही रेल्वे दर शुक्रवारी दुपारी 1 वाजता सुटून त्याच रात्री 12 वाजून 20 मिनिटांनी एलटीटीला पोहचणार आहे. ही रेल्वे 22 नोव्हेंबर ते 3 जानेवारीदरम्यान चालविण्यात येणार आहे. 22 नोव्हेंबर ते 3 जानेवारी दरम्यान, प्रत्येक शुक्रवारी 01051 एलटीटी-करमळी ट्रेन रात्री 8 वाजून 45 मिनिटांनी सुटणार आहे. तसेच ही रेल्वे दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजून 30 मिनिटांनी करमळीला पोहचणार आहे. तर 24 नोव्हेंबर ते 5 जानेवारीदरम्यान, दर रविवारी परतीच्या प्रवासासाठी 01052 रेल्वे दुपारी 1 वाजता सुटणार आहे. ही रेल्वे रात्री 12 वाजून 20 मिनिटांनी एलटीटीला पोहचणार आहे. या दोन्ही स्पेशल ट्रेन ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्‍वर, रत्नागिरी, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी आणि थिविम या स्थानकांवर थांबणार आहेत.

हेही वाचा - IRCTC Special Tourist Train: भारत दर्शन - केवळ 9,900 रुपयांत फिरा देशभर, IRCTC ची पर्यटकांसाठी स्पेशल ऑफर

23 नोव्हेंबर ते 5 जानेवारीदरम्यान, 01015 पनवेल-करमळी स्पेशल रेल्वे दर रविवारी रात्री 12 वाजून 55 मिनिटांनी सुटणार आहे. ही रेल्वे त्याच दिवशी दुपारी 12 वाजून 30 मिनिटांनी करमळीला पोहचणार आहे. प्रवाशांना या स्पेशल ट्रेनचे आरक्षण ऑनलाइन करता येणार आहे. मध्य रेल्वेने आपल्या प्रवाशांसाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वे प्रत्येक वर्षी काही ठरावीक सणानिमित्त रेल्वे गाड्या सोडत असते. त्यामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यास मदत होते.