Pune Porsche Crash Case: पुणे पोर्शे अपघात प्रकरणातील मृतांचे नातेवाईक CM Eknath Shindeच्या भेटीला; मुख्यमंत्री सहाय्यता निधी देण्याचा निर्णय
या प्रकरणी अद्याप चौकशी तपासणी सुरु आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी पोर्शे अपघात प्रकरणात मरण पावलेल्या तरुणांच्या नातेवाईकांची भेट घेतली.
Pune Porsche Crash Case: पुणे पोर्शे (Porsche) अपघातात दोन निष्पाप तरुणांचा जीव गेला. या प्रकरणी अद्याप चौकशी तपासणी सुरु आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी पोर्शे अपघात प्रकरणात मरण पावलेल्या तरुणांच्या नातेवाईकांची भेट घेतली. दोषींना माफ केल जाणार नाही असा आश्वासन देण्यात आले. मुख्यमंत्रींनी मृत तरुण अनिश अवधियाचे वडील ओमप्रकाश अवधिया आणि तरुणी अश्विनी कोष्टाचे वडील सुरेश कोष्टा यांची भेट घेऊन सांत्वन केले. ही घटना दुर्दैवी असून दोषींना कठोर शिक्षा दिली जाईल अशी माहिती दिली. (हेही वाचा- पुणे पोर्शे कार अपघातामध्ये अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे बदलले नमुने त्याच्या आईचेच; Forensic Report मधून आले समोर)
निधी देण्याचा निर्णय
या घटनेतील अल्पवयीन आरोपीची सुटका झालेली असतानाही ही केस नव्याने हाती घेत दोषी असलेल्या सर्वांवर कारवाई केली असल्याचे सांगितले. तसेच या प्रकरणाचा खटला जलद गतीने चालवून दोषींना कठोर शासन केले जाईल असे यावेळी स्पष्ट केले. विशेष बाब म्हणजे दोन्ही मृत मुलांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी 10 लाख रुपये मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी युवासेना सचिव किरण साळी देखील उपस्थित होते.
पुणे पोलिस आयुक्तांची भेट
पुण्यात गेल्या काही दिवसांपासून ड्रग्ज प्रकरण वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्याचे पोलिस आयुक्तांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी पुण्यातील बेकादेशीर पबवर कठोर कारावाई करण्याचे निर्देश दिले आणि इमारत नियमांच्या विरोधात असलेल्या सर्व बांधकामांवर बोल्डोझर फिरवा. पुण्याला अंमली पदार्थमुक्त शहर बनवण्यासाठी अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्यांवर नव्याने कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी पोलिसांना दिले.