Lockdown: लॉकडाऊनमुळे परराज्यात अडकलेल्या मजूरांच्या रेल्वे तिकिटाचे शुल्क मुख्यमंत्री सहायता निधी मधून भरण्यात येणार
सध्या परराज्यातील मजूर त्यांच्या राज्यात परतत आहेत. तसेच महाराष्ट्रातील मजूर इतर राज्यांतून परत येत आहेत. त्यांच्याकडे रेल्वे प्रवासाची रक्कम भरण्यासाठी पैसे नाहीत. हे लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री सहायता निधी मधून तिकिटाचे शुल्क भरण्याचा निर्णय घेतला आहे.
Lockdown: लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रातील अनेक मजूर (Labourer) परराज्यात अडकले आहेत. सध्या परराज्यातील मजूर त्यांच्या राज्यात परतत आहेत. तसेच महाराष्ट्रातील मजूर इतर राज्यांतून परत येत आहेत. त्यांच्याकडे रेल्वे प्रवासाची रक्कम भरण्यासाठी पैसे नाहीत. हे लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री सहायता निधी (Chief Minister's Relief Fund) मधून तिकिटाचे शुल्क भरण्याचा निर्णय घेतला आहे.
परराज्यात अडकलेल्या मजूरांसाठी महाराष्ट्र सरकार धावले असून या मजूरांना आपल्या राज्यात सोडण्यासाठी विशेष रेल्वे चालवण्यात येत आहेत. दरम्यान, भारतीय रेल्वेने 12 मेपासून प्रवासी रेल्वे गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, यात काही ठरावीक गाड्याचं सुरु करण्यात येणार आहे. रेल्वे प्रशासनाने रविवारी एका निवेदनाद्वारे यासंदर्भात माहिती दिली आहे. (हेही वाचा - शिधापत्रिकाधारकाला 3 महिन्यांसाठी नियमित धान्यासोबतच प्रति महिना 1 किलो चणाडाळ किंवा तूरदाळ मोफत मिळणार - छगन भुजबळ)
याशिवाय लॉकडाऊनमुळे राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात अडकून पडलेल्यांना आपल्या मूळगावी जाण्यासाठी सोमवारपासून एसटी सेवा सुरू करण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. एका बसमधून केवळ 22 जणांना प्रवास करता येणार आहे. यासाठी नागरिकांकडून प्रवासाठी शुल्क आकारण्यात येणार आहे.