Uddhav Thackeray: होळी आणि धुलिवंदनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जनतेला खास आवाहन

राज्यात गेल्या काही आठवड्यापासून रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. कोरोनाच्या काळात अनेक सण लॉकडाऊनच्या निर्बंधाखाली साजरा करावा लागले आहे.

Uddhav Thackeray | (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्रात (Maharashtra) पुन्हा एकदा कोरोनाचा (Coronavirus) उद्रेक पाहायला मिळत आहे. राज्यात गेल्या काही आठवड्यापासून रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. कोरोनाच्या काळात अनेक सण लॉकडाऊनच्या निर्बंधाखाली साजरा करावा लागले आहे. कोरोना संसर्गाची सद्यस्थिती लक्षात घेता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी होळी (Holi) आणि धुलिवंदनाच्या (Dhulivandan 2021) पूर्वसंध्येला राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच परस्परांची आणि पर्यावरणाची काळजी घेत येणार सण साधेपणाने साजरे करण्याचे जनतेला आवाहन केले आहे.

राज्यातील जनतेला होळी, धूलिवंदनच्या हार्दिक शुभेच्छा. परस्परांची आणि पर्यावरणाची काळजी घेत येणारे सण साधेपणाने साजरे करण्यात यावे. सण-उत्सवाचा आनंद हा परस्परांविषयी, निसर्गाविषयी आदर वाढवतो. या सणांकडून प्रेरणा घेऊन कोरोना नियमांचे काटेकोर पालन करूया, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. हे देखील वाचा- Maharashtra Government Issues New Guidelines: महाराष्ट्रात 15 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवला; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर

ट्वीट-

महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 35 हजार 726 कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर, 166 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. ज्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 26 लाख 73 हजार 461 वर पोहचली आहे. यापैकी 23 लाख 23 हजार 579 रुग्णांची नोंद झाली आहे. तर, राज्यात आतापर्यंत 54 हजार 73 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या 3 लाख 3 हजार 475 रुग्ण सक्रीय आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif