Fire At Serum Institute: सीरम इन्स्टिट्यूटला लागलेल्या आगीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या पुण्याला जाणार
या आगीत पाच कंत्राटी मजुरांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात एकच खळबळ माजली आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून स्थानिक पोलिसांनी पुढील चौकशीला सुरूवात केली आहे.
CM Uddhav Thackeray To Visit Pune: पुण्यातील (Pune) सीरम इन्स्टिट्यूटला (Serum Institute) आज दुपारी भीषण आग लागली. या आगीत पाच कंत्राटी मजुरांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात एकच खळबळ माजली आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून स्थानिक पोलिसांनी पुढील चौकशीला सुरूवात केली आहे. याचपार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) उद्या पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला भेट देऊन आगीची पाहणी करणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटर हॅंडलवर माहिती देण्यात आली आहे.
या आगीत मरण पावलेल्या पाच जणांपैकी दोघे जण पुण्यातील असून दोन जण उत्तर प्रदेश व एकजण बिहारमधील आहे. हे सर्वजण कंत्राटी मजूर असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, मृतांच्या कुटुंबियांना सीरम इन्स्टिट्यूटकडून 25 लाखांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, सीरम इन्स्टिट्यूटला भेट दिल्यानंतर उद्धव ठाकरे काय बोलतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हे देखील वाचा- Fire At Serum Institute: सीरम इन्स्टिट्यूटमध्ये आग लागली का लावली? वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली शंका
मुख्यमंत्री कार्यालयाचे ट्विट-
पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी नुकतीच घटनास्थळी जाऊन पाहणी केली. "सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया' या संस्थेत एका इमारतीस लागलेल्या आगीत 5 जणांचा दुर्दैवी होरपळून मृत्यू झाला. आगीची बातमी समजताच घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. आग विजल्यानंतर कुलिंग करत असताना 5 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची सुन्न करणारी माहिती समोर आली, असे मुरलीधर मोहोळ म्हणाले आहेत.
सीरमने काही दिवसांपूर्वीच कोरोना प्रतिबंधक लस असलेली कोविशिल्ड लस देशभरात वितरणासाठी उपलब्ध करून दिली आहे. सध्या संपूर्ण देशात कोविशिल्ड लसीकरणाची मोहीम सुरु आहे. मात्र, आज सीरम इन्स्टिट्यूटला आग लागल्यानंतर संपूर्ण देशातून चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.