निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतला आढावा; चक्रीवादळग्रस्तांना आणखी वाढीव निधी वितरित करणार
निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणासह राज्यातील अनेक ठिकाणी नुकसान झालं आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे. तसेच नुकसानग्रस्तांना गेल्या आठवड्यात जाहीर केलेल्या मदतीपेक्षा आणखी वाढीव मदत देणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.
निसर्ग चक्रीवादळामुळे (Nisarg Cyclone) झालेल्या नुकसानीचा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे (Video Conferencing) आढावा घेतला. निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणासह राज्यातील अनेक ठिकाणी नुकसान झालं आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे. तसेच नुकसानग्रस्तांना गेल्या आठवड्यात जाहीर केलेल्या मदतीपेक्षा आणखी वाढीव मदत देणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.
यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की, निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई नुकसानग्रस्तांना तात्काळ देण्याचे काम सुरु आहे. नुकसानग्रस्तांना तात्काळ व योग्य मदत देण्यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर काम करावे. नुकसानग्रस्तांना वाढीव मदतीत देण्यात येईल, असंही ठाकरे यांनी सांगितले आहे. (हेही वाचा - कोरोना व्हायरसमुळे संकटात सापडलेल्या उद्योगांना दिलासा: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाद्वारे आकारण्यात येत असलेल्या विविध शुल्क आकारणीस 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ)
प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी शासनाने दिलेली मदत ही शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. संकट कितीही गंभीर असले, तरी सरकार जनतेसोबतचं आहे, असा विश्वासही यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज्यातील नागरिकांना दिला. कोकणातील फळबागांचे चक्रीवादळामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. या फळबागा वाचविण्यासाठी योग्य धोरण आखण्यात येईल, असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
दरम्यान, या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगला उपमुख्यमंत्री अजित पवार, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, रायगडच्या पालकमंत्री कु. आदिती तटकरे, खा. सुनील तटकरे, आदी अधिकारी उपस्थित होते. यावेळी अजित पवार यांनी प्रशासन व लोकप्रतिनिधींनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश दिले.