Devendra Fadnavis On Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माझे बॉस आहेत, आमच्यात सर्व काही ठीक आहे; देवेंद्र फडणवीस यांचं स्पष्टीकरण

आम्ही योग्य समन्वय राखला आहे. मी त्यांचा प्रोटोकॉल नेमही पाळतो आणि सीएम शिंदे यांनी मला कधीच मी त्यांच्या खाली असल्याचे भासवले नाही. त्यांनी नेहमीचं माझ्या सीमांचा आदर केला आहे. आम्ही दोघेही एकमेकांबद्दल आदर करतो, असंही देवेंद्र फडणवीस यांनी 'दि इंडियन एक्सप्रेस'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे.

CM Eknath Shinde and Dy CM Devendra Fadnavis | (Photo Credit - Twitter)

Devendra Fadnavis On Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) माझे बॉस आहेत. आमच्या नात्यात कोणतेही महत्त्वपूर्ण बदल झालेले नाहीत. मी मुख्यमंत्री म्हणून पाच वर्षे सरकार चालवले असले, तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मी माझे वरिष्ठ म्हणून स्वीकारले आहे. मात्र, शिंदे माझे वरिष्ठ असल्याचे आपल्या वागण्यातून कधीही जाणवू देत नाहीत. आमच्यात योग्य समन्वय असल्याचंही देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितलं आहे.

आमचे संबंध सुरुवातीपासून चांगले आहेत. आम्ही योग्य समन्वय राखला आहे. मी त्यांचा प्रोटोकॉल नेमही पाळतो आणि सीएम शिंदे यांनी मला कधीच मी त्यांच्या खाली असल्याचे भासवले नाही. त्यांनी नेहमीचं माझ्या सीमांचा आदर केला आहे. आम्ही दोघेही एकमेकांबद्दल आदर करतो, असंही देवेंद्र फडणवीस यांनी 'दि इंडियन एक्सप्रेस'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे. (हेही वाचा -Kalyan Lok Sabha Constituency: 'कल्याण'चा 'ठाणे'दार कोण? देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले, मुख्यमंत्री पुत्र श्रीकांत शिंदे सुरक्षीत)

मुलाखती दरम्यान, देवेंद फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे का? असा प्रश्न करण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाचा निर्णय मान्य करणार असल्याचे सांगितले. भाजप संसदीय मंडळ 2024 मध्ये मुख्यमंत्री कोण होणार हे ठरवेल, असंही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. (हेही वाचा - Devendra Fadnavis on Thackeray and Pawar: शरद पवार यांनी डबल गेम केला, उद्धव ठाकरे यांनी खंजीर खुपसला- देवेंद्र फडणवीस)

तथापी, राजकारणात त्याग आणि सहनशक्ती महत्त्वाची असते. भाजप पक्षाच्या बैठकीदरम्यान, मी पक्षाच्या हितासाठी बाजूला होण्याच्या माझ्या निर्णयाची माहिती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिली. आणि कोणत्याही मंत्रिपदाची मागणी केली नाही किंवा आघाडी सरकारकडे मागणी केली नाही. पण त्यांना अनुभवी व्यक्तीची गरज होती आणि त्यांनी माझी निवड केली. मी सर्व कर्तव्ये मनापासून स्वीकारली, असंही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.