मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी अमृता फडणवीस यांच्यासह घेतले केदारनाथ दर्शन

पंतप्रदानांनी 18 मे या दिवशी केदारनाथ (Kedarnath Temple यात्रा केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केदारनाथाचे दर्शन घेतले तेव्हा, त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) आणि कुटुंबीय उपस्थित होते.

Chief Minister Devendra Fadnavis To Visit Kedarnath Temple | (Photo Credits-Twitter)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पावलावर पाऊल टाकत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis) यांनी केदारनाथाचे दर्शन घेतले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वी केदारनाथाचं दर्शन घेऊन तेथील गुहेत ध्यानधारणाही केली होती. पंतप्रदानांनी 18 मे या दिवशी केदारनाथ (Kedarnath Temple यात्रा केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केदारनाथाचे दर्शन घेतले तेव्हा, त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) आणि कुटुंबीय उपस्थित होते.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान पार पडले. या मतदानाची मतमोजणी उद्या (24 ऑक्टोबर) पार पडत आहे. मतदानाचा दिवस आणि मतमोजणीचा दिवास यांमध्ये दोन दिवसांचे अंतर आहे. या मधल्या काळात मिळालेली उसंत ध्यानात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केदारनाथाचे दर्शन घेतले. दरम्यान, केदारनाथ दर्शन करुन मुख्यमंत्री फडणवीस परतले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस हे उद्या मुंबईत असणार असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. (हेही वाचा, जोशी असलो तरी ज्योतीषी नाही, महायुती 200 जागा पार करणे कठीण: मनोहर जोशी)

मुख्यमंत्री फडणवीस ट्विट

दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी एकूण 288 जागांपैकी शिवसेना ही 124 तर भाजप हा 164 जागांवर लढतो आहे. उर्वरीत जागांव युतीचे मित्रपक्ष लढत आहेत. तर, दुसऱ्या बाजूला काँग्रेस-राष्ट्रवादी हे पक्ष आघाडी करुन लढत आहेत. काँग्रेस 147 तर, राष्ट्रवादी 124 जागा लढवत आहे. उर्वरीत जागा दोन्ही पक्षांनी समाजवादी पक्ष, आरपीआय, स्वाभिमानी शेतकरी संघटना, जनता दल, शेतकरी कामगार पक्ष अशा मित्रपक्षांना सोडल्या आहेत. मतमोजणीच्या पार्श्वभूमिवर राज्यातील राजकीय वर्तुळ आणि सर्वच नेत्यांसह कार्यकर्ता आणि जनतेमध्ये उत्सुकतेचे वातावरण आहे.