Chhatrapati Sambhajinagar Crime : ट्राफिक पोलिसांना दंड द्यावा लागू नये म्हणून तरुणाचा जुगाड; नंबर प्लेटला लावले स्टीकर (Watch Video)

वाहतूकीचे नियम मोडणाऱ्यांकडून पोलीस दंड आकारतात. अशा वेळा तरुण जुगाड लावत दंड भरण्यापासून स्वता:ची सुटका करून घेतात. छत्रपती संभाजीनगरमधून ही अशीच एक घटना समोर आली आहे.

Photo Credit - x

Chhatrapati Sambhajinagar Crime : राज्यात आता ठिकठिकाणी सरकारकडून सीसीटीव्ही कॅमेरे लावले गेलेत. त्यामुळे जर कोणी सिग्नल मोडण्याचा, किंवा इतर वाहतूकीचे नियम मोडण्याचा प्रयत्न केला तर, त्याला ऑनलाईन चलान (challan )पाठवले जाते. मात्र, त्यातही काही धुरंदर आहेत. जे वाहतूकीचे नियम मोडून दंड( Traffic Police Fine) भरावा लागू नये यासाठी वेगेवगळी शक्कल वापर असल्याचं अनेक घटनांतून समोर आलं आहे. अशीच एक घटना छत्रपती संभाजीनगर(Chhatrapati Sambhajinagar)मधून समोर आली आहे. ज्यात एकाने दुचाकीच्या नंबर प्लेटवर काळ्या रंगाचे स्टीकर लावले होते. वाहतूक पोलिसांनी त्याला पकडून त्याच्या दुचाकीचे स्टीकर काढले आहेत. सध्या या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. (हेही वाचा :Dombivali Crime: डोंबिवलीत चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर जीवघेणा हल्ला, आरोपी फरार )

तरूणाने गाडीच्या नंबर प्लेटवर असणारे आकडे लपवण्यासाठी काळे स्टिकर लावून पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या हा संपूर्ण प्रकार लक्षात आल्यानंतर तरुणाचा नियम तोडल्यानंतर दंड न भरण्याचा संपूर्ण डाव फसला. पोलिसांनी या तरुणाला वेळीच पकडून त्याला दंड भरायला लावला. (हेही वाचा :Mumbai Crime : लग्नास नकार दिल्यामुळे मालाडमध्ये शिक्षिकेवर जीवघेणा हल्ला; लोखंडी सळईने मारहाण )