Chhatrapati Sambhaji Nagar News: महापालिका शाळेचा अजब कारभार, सात वर्षांच्या मुलीस वर्गात कोंडले; काही तासांनी सुटका
छत्रपती संभाजीनगर शहरात महापालिकेच्या एका शाळेत पहिल्या इयत्तेतील विद्यार्थिनी वर्गात असताना वॉचमन वर्गाला कुलूप लावून निघून गेला.
Chhatrapati Sambhaji Nagar News: छत्रपती संभाजीनगर शहरात महापालिकेच्या एका शाळेत पहिल्या इयत्तेतील विद्यार्थिनी वर्गात असताना वॉचमन (Watchman) वर्गाला कुलूप लावून निघून गेला. या घटनेमुळे परिसरात संतापजनक वातावरण निर्माण झाले. घाबरलेल्या मुलीने खिडकीडजवळ येऊन रडायला सुरुवात केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी आणि मुलांनी कुलूप तोडून तिला बाहेर काढले. रोजाबाग येथील महानगर पालिका शाळेत ही घटना घडली.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उम्मेखैर मुजम्मिल असं या मुलीच नाव आहे. या घटनेमुळे मुलीच्या पालकांनी आणि इतर पालकांनी देखील पालिकेवर संताप व्यक्त केला.या घटनेअंतर्गत संबंधिक वॉचमनला निलंबित करण्यात आली आहे. सोमवरी २५ सप्टेंबर रोजी नेहमी प्रमाणे शाळा सकाळी भरली. दुपारी शाळा सुटल्यानंतर वॉचमनने सर्व खोल्यांना कुलूप लावून निघून गेला. सर्व खोल्या न तपासता, वॉचमन विठ्ठल बमने कुलूप लावला, मुलीला ही गोष्ट लक्षात येताच तीनं वर्गातील दार ठेकलं. परंतू यातून कोणीही प्रतिसाद दिला नाही.
ती खूप घाबरली आणि रडत रडत खिडकी जवळ आली. रडण्याचा आवाज ऐकताच, आसपासच्या स्थानिकांनी शाळेकडे धाव घेतली. त्यांनी खिडकीत त्यांना एका बंद खोलीत मुलगी दिसली. परिसरातील नागरिक जमा होताच, त्यांनी वर्गातील कुलूप हातोड्याच्या साहाय्याने तोडण्यासाठी सज्ज झाले. काही वेळानंतर मुलीला बंद खोलीतून बाहेर काढण्यात आले. मुलीला पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांनी पालिकेच्या शाळेबद्दल संताप व्यक्त केला. या घटनेइअंतर्गत वॉचमनला निलंबित करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. काही स्थानिकांनी वॉचमन दारू पिऊन काम करायचा असा आरोप केला आहे.