Chhatrapati Sambhaji Nagar News: खेळण्यासाठी गेले ते परतलेच नाही, चार मुलांचा बुडून मृत्यू, छत्रपती संभाजी नगर येथील घटना
रांजणगाव येथील शेणपुंजी भागात एका तलावात चार मुलाचा बुडून मृत्यू झाला आहे.
Chhatrapati Sambhaji Nagar News: छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) जिल्हायातील वाळूज (Waluj) येथे एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. रांजणगाव येथील शेणपुंजी भागात एका तलावात चार मुलाचा बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच, पोलिस आणि अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने बुडलेल्या चारही मुलांना बाहेर काढण्यात आले असून त्यांना घाटी रुग्णालयत पाठवण्यात आले आहे. (हेही वाचा- शालमला नदीत एकाच कुटुंबातील 5 जणांचा बुडून मृत्यू; 3 मृतदेह सापडले,)
मिळालेल्या माहितीनुसार, बिस्वजित सुखदेव उपाध्याय कुमार (वय 12 वर्षे), अफरोज जावेद शेख (वय 12 वर्षे), जावेद शेख (वय 14 वर्षे), अबरार जावेद शेख (वय 12वर्षे) असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या चारही मुलांची नावं आहे. काल दुपारी दोनच्या सुमारास घरातून मुले खेळण्यासाठी बाहेर पडले होते, दुपारी खेळता खेळता ते तलावात डुबक्या घेण्यासाठी गेले होते, पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले. दरम्यान सांयकाळी ते पुन्हा परतलेच नाही त्यामुळे परिसरात घरांनी शोध घेतला त्यानंतर तलावाजवळ गेले तर दोघांचे कपडे दिसले. त्यामुळे सर्वांचा संशय पक्का झाला, तात्काळ घरांच्यांनी पोलिस आणि अग्निशमन दलाला सांगितले.
पोलिस आणि अग्निशमन दलाचे घटनास्थळी दाखल झाले. अथक प्रयत्नांनी चार ही मुलांना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर लगेच त्यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात मुलांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.या घटनेची माहिती गावात पसरताच, मोठी शोककळा पसरली. नातेवाईकांनी मुलांचे मृतदेह पाहून हंबराडा फोडला.