Chhatrapati Sambhaji Nagar Accident: बसच्या धडकेच चार वर्षाच्या मुलाचा मृत्यू, संपप्त जमावाने बस जाळली, चितेगावातील घटना
एका चार वर्षाच्या मुलाचा अपघातात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
Chhatrapati Sambhaji Nagar Accident: महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) जिल्ह्यात एक संतापजनक घटना घडली. एका चार वर्षाच्या मुलाचा अपघातात (Accident) मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. आई सोबत मुलगी चॉकलेट आणण्यसाठी निघाली होती, दरम्यान बसच्या धडकेत मृत्यू झाला. घटनेनंतर संपप्त जमावाने बसची तोडफोड करत आग लावून पेटवून दिली. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. घटनेनंतक अग्निशमन दलाला पाचरण करण्यात आले. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. (हेही वाचा- बाईकवर स्टंटबाजी करताना समोरून येणाऱ्या कारला बसली धडक; तरुणाचा जागीच मृत्यू)
मिळालेल्या माहितीनुसार, शाहरुख पठाण असं या अपघातात मृत झालेल्या मुलाचे नाव आहे. ही घटना चितेगाव येथील पांगरा रोडवर झाली. शाहरुख हा आईचा बोट धरून किराणा आणण्यासाठी दुकानाच्या दिशेने जात होता. दरम्यान एका शाळेच्या बसच्या धडकेत आई आणि मुलगा दोघांही गंभीर झाले. मात्र, शाहरुख हा बसच्या चाकाखाली आल्याने त्याच्या जागीच मृत्यू झाला. स्थानिकांनी गंभीर जखमी असलेल्या आई आणि मुलाला रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत्य घोषित केले.
घटनेची माहिती पोलिसांना देण्याच आली. पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. चितेगाव येथी पांगरा रोडवर झालेल्या या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली. पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरिक्षक गणेश सुरवसे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिस घटनास्थळी पोहेच पर्यंत बस संपुर्ण जळून खाक झाली होती. पोलिसांनी चालकाविरुध्द गुन्हा दाखल केला.