Maratha Reservation: 'मनोज जरांगे यांना देवही घाबरतो, सरकारने त्यांचं ऐकवं, माझाही त्यांना पाठिंबा'

सरकारने त्यांच्या मागण्या तातडीने मान्य कराव्यात. इतकेच नव्हे तर ते आंदोलन करत असलेल्या ठिकाणी काही मंत्र्यांना बंगलेही बांधून द्यावेत, जेणेकरुन त्यांच्या मागण्या तातडीने मान्य करता येतील, असे भुजबळ यांनी म्हटले आहे.

मनोज जरांगे यांच्यावरुन छगन भुजबळ यांची राज्य सरकारवर टोलेबाजी | (Photo credit: archived, edited, representative image)

मराठा आरक्षण (Maratha Reservation) मुद्द्यावरुन मराठा विरुद्ध ओबीस (OBC Reservation) असा संघर्ष महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. खास करुन आरक्षणाच्या मुद्यावर आंदलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे (Manoj Jarange) आणि ओबीसींकडून छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) या दोन नेत्यांमध्ये जोरदार सामना पाहायला मिळत आहे. दोन्ही नेते परस्परांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप करत आहेत. यातून तोडगा काहीच निघत नाही, जनतेचे मात्र मनोरंजन होऊ लागले आहे. दोन्ही नेते आपपल्या मुद्द्यांवर ठाम असल्याने हा संघर्ष अधिक वाढतो की काय, अशी स्थिती असतानाच आता छगन भुजबळ यांनी आपल्या खास शैलीत राज्य सरकारला टोले लगावले आहेत.

'आंदोलनाच्या ठिकाणी मंत्र्यांना बंगले बांधून द्या'

जरांगे यांना देवही घाबरतो, त्यामुळे माझाही त्यांना पाठिंबा आहे. सरकारने त्यांच्या मागण्या तातडीने मान्य कराव्यात. इतकेच नव्हे तर ते आंदोलन करत असलेल्या ठिकाणी काही मंत्र्यांना बंगलेही बांधून द्यावेत, जेणेकरुन त्यांच्या मागण्या तातडीने मान्य करता येतील, असे भुजबळ यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, Chhagan Bhujbal Claims Threat To Life: 'माझी हत्या होऊ शकते'; मराठा विरोधी भूमिकेवरून जीवाला धोका असल्याचा छगन भुजबळांचा दावा)

'जरांगे यांच्या मनात अभिनव कल्पना'

छगन भुजबळ यांनी सरकारवर मिश्कीलपणे निशाणा साधत म्हटले आहे की, राज्य सरकारने मनोज जरांगे यांचे आणायला पाहिजे. सरकारने त्यांना वेटीस धरु नये. त्यांच्या मनात रोज अभिनव कल्पना येत असतात. त्यामुळे राज्य सरकारने त्यांना तातडीने सरसकट आरक्षण द्यावे. ते महान आहेत. देवही त्यांना घाबरतो. त्यामुळे माझाही त्यांना पाठींबा आहे. त्यामुळे त्यांना आरक्षण द्यावे. ते म्हणतात तसे व्याह्यांचे व्याही, सासू सासरे त्यांचे नातेवाईक अशा सगळ्यांना आरक्षण द्यावे. सरकारने उगाचच वाटाघाटीचा घोळ घालत बसू नये. सरकारने फक्त त्यांचेच ऐकावे. खरे तर राज्य सरकारने ते आंदोलन करतील त्या ठिकाणी काही मंत्र्यांना बंगले बांधून द्यावेत. जेणेकरुन त्यांनी शब्द उच्चारला की, लगेचच त्याची पूर्तता करता येईल', अशा शब्दांमध्ये भुजबळ यांनी राज्य सरकारवर उपरोधीक टीका केली आहे. (हेही वाचा, CM Eknath Shinde On Maratha Reservation: 'मराठा आरक्षण' विषयावर विधिमंडळात 17 तास 17 मिनिटे चर्चा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून उत्तर (Watch Video))

भुजबळ यांनी पुढे म्हटले आहे की, जरांगे यांच्या मागे राज्य सरकारने ठाम उभे राहावे. कारण सात ते आठ कोटी मराठा नागरिक त्यांच्या मागे आहेत. त्यामुळे ते म्हणती ती पूर्वदिशा ठरवावी. हवे तर ते ज्या ठिकाणी थांबतील त्या ठिकाणी एक निवृत्त न्यायाधीशांचं कार्यालय सुरु करावे. लगोलग माझा जामीनही रद्द करा. माझे तर म्हणने असे आहे की, जरांगे यांनी सरकारला नव्हे तर सरकारनेच त्यांना वेटीस धरले आहे. पुढच्या मेळाव्यात मी स्वत:च त्यांच्या बाजूने भाषण करणार आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif