शिवाजी महाराज यांचा इतिहास चौथीच्या पुस्तकातून हटवण्याच्या निर्णयावरून भडकले छत्रपती संभाजीराजे; ट्वीटरवर व्यक्त केला निषेध

आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या पुस्तकातून शिवाजी महाराजांचा इतिहास काढून टाकण्याच्या निर्णयावरून सध्या महाराष्ट्रात राजकारण तापायला सुरूवात झाली आहे.

Sambhaji Chhatrapati | Photo Credits: Twitter

आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या पुस्तकातून शिवाजी महाराजांचा इतिहास काढून टाकण्याच्या निर्णयावरून सध्या महाराष्ट्रात राजकारण तापायला सुरूवात झाली आहे. खासदार आणि कोल्हापूरचे  छत्रपती संभाजीराजे यांनी निषेध व्यक्त केला आहे. ट्वीटरच्या माध्यमातून भावना व्यक्त करताना अशाप्रकारची आगळीक खपवून घेतली जाणार नाही असे सांगत त्यांच्यावर तात्काळ कारवाई करा असे ते म्हणाले आहे. तसेच ते लवकरच  केंद्रीय शालेय शिक्षण मंत्र्यांची भेट घेऊन केंद्रीय शिक्षण मंडळाकडून शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवला जावा यासाठी रेटा लावणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. उस्मानाबाद येथील मराठा विद्यार्थ्याच्या आत्महत्येनंतर छत्रपती संभाजीराजे यांचा आक्रमक पवित्रा; पदवीपर्यंत सर्वच जातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण मोफत करण्याची ट्विटरवरुन मागणी (पहा व्हिडिओ)

महाराष्ट्रामध्ये सध्या निवडणूकीची रणधुमाळी सुरू आहे. यामध्ये शिवरायांच्या नावाने मताचा जोगवा मागितला जात आहे. मात्र अशातच राज्यातील आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या पुस्तकातून शिवाजी महाराजांचा इतिहास काढून टाकण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. यावरून वाद रंगला आहे. सकाळच्या वृत्तानुसार, या प्रकरणावर आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाकडूनही काहीही बोलण्यास नकार देण्यात आला आहे.

छत्रपती संभाजी ट्वीट  

 

ज्योतिरादित्य सिंधिया यांची प्रतिक्रिया

 

मराठा आरक्षण मिळावं म्हणून छत्रपती संभाजी यांनी राज्यभर आंदोलन केलं होतं. तसेच कोल्हापूर पूराच्या वेळेसही त्यांनी मदतीचा हात पुढे केला होता. अनेकदा सरकारवर टीका केल्याने ते चर्चेमध्ये आले होते.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif