चंद्रपूर: 12 वर्षांची मुलगी 4 महिन्यांची गर्भवती, मैत्रिणीच्या वडिलाकडून बलात्कार
पीडितेला पोटदुखीचा त्रास होऊ लागला. त्यामुळे पीडितेने आईकडे तक्रार केली. घरगुती उपाय करुनही काही फरक पडला नाही. त्यामुळे पीडितेच्या आई तिला घेऊन डॉक्टरांकडे गेली. डॉक्टरांनी पीडितेची वैद्यकीय तपासणी केली असता ती गर्भवती असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली.
बारा वर्षांची अल्पवयीन मुलगी 4 वर्षांची गर्भवती (Pregnant) राहिल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर (Chandrapur) येथे उघडकीस आली आहे. धक्कादायक असे की, मित्रिणीच्या वडीलांकडूनच (Friend's Father) पीडितेवर बलात्कार करण्यात आला. हा नराधम गेले प्रदीर्घ काळ तिचे लैंगिक शोषण करत होता. त्यातूनच ती गर्भवती राहिली. या नराधम या पीडितेला कोठे सांगू नकोस. सांगितले तर, जीवे मारीन अशी धमकी दित असे. त्यामुळे आपल्यावरील अत्याचार मनात असूनही ही पीडिता गेली प्रदीर्घ काळ कोणालाच सांगू शकली नाही.
पीडितेला पोटदुखीचा त्रास होऊ लागला. त्यामुळे पीडितेने आईकडे तक्रार केली. घरगुती उपाय करुनही काही फरक पडला नाही. त्यामुळे पीडितेच्या आई तिला घेऊन डॉक्टरांकडे गेली. डॉक्टरांनी पीडितेची वैद्यकीय तपासणी केली असता ती गर्भवती असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. या प्रकारमुळे पीडितेची आई आणि नातेवाईक सगळेच हबकून गेले. पीडितेला विश्वासात घेऊन चौकशी केली असता मैत्रीणिच्या बापानेच हे कृत्य केल्याचे समोर आले. या प्रकरणाची पोलिसांमध्ये तक्रार नोंदविण्यात आली असून पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे.
दरम्यान, पुणे येथूनही बलात्काराची आणखी एक घटना उघडकीस आली आले. पुणे येथील एका महिलेला चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये काम मिळवून देतो असे सांगूनक दोन व्यक्तींनी एका महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. आरोपींनी संबंधित महिलेला पुणे येथून मुंबईला आणले. तिथे तिच्यावर बलात्कार केला आणि तिला तिथेच सोडून पळ काढला. पीडितेने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा नोंदवला आहे. आरोपी नागपूरला गेले असल्याचे समजल्यावर पोलिसांचे एक पथक नागपूरला रवाना झाले आहे. (हेही वाचा, मुंबई: नग्न फोटो दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार, 21 वर्षीय तरुणाला झाली 20 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा)
दरम्यान, चंद्रपूर येथील घटना कोरोना पेक्षाही भयानक असल्याची प्रतिक्रिया भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी व्यक्त केली आहे. सध्या कोराना व्हायरस संकटामुळे बऱ्याच गोष्टींच्या अंमलबजावणीवर मर्यादा येत आहेत. मात्र, राज्य सरकारने असे असले तरी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी आणि आरोपींवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
(The above story first appeared on LatestLY on Mar 15, 2020 11:57 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

