Solapur News: सोलापूरात भीम आर्मी कार्यकर्त्यांचा चंद्रकांत पाटीलांवर शाई फेक, भाजपाविरोधात घोषणाबाजी
पोलिसांनी शाईफेक करणाऱ्याला ताब्यात घेतलं आहे.
Solapur News: सोलापूरात चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)यांच्यावर शाईफेक करण्यात आली आहे. हा प्रकार कॅमेरात कैद झाला आहे. भीम आर्मीच्या कार्यकर्त्याने शाई फेकून चंद्रकांत पाटीलांचा विरोध केला आहे. धक्कादायक म्हणजे पोलिस बंदोबस्त असून देखील भीम आर्मीच्या अजय मैनदर्गीकर असं नाव असलेल्या कार्यकर्त्याने शाई फेकली. चंद्रकांत पाटील हे सद्या सोलापूर दौऱ्यावर असताना ही घटना घडली. सोलापूरातील शासकिय विश्रामगृहात ही घटना घडली.
चंद्रकांत पाटील यांनी नुकतीच सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारली असून रविवारी सायंकाळी त्यांचा हा पहिलाच सोलापूर दौरा होता. चंद्रकांत पाटील यांच्या आगमनावेळी विश्रामगृहात येणाऱ्या सर्व पाहुण्यांसाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. यापूर्वी विखे-पाटील यांच्यावर झालेल्या हल्ल्यात सहभागी शेखर बंगाळे याने चंद्रकांत पाटील यांना निवेदन देण्याचा प्रयत्न केला होता, परंतु दक्ष पोलिसांनी त्याला तत्काळ ताब्यात घेतले. सुरक्षेचे उपाय असतानाही अजय मेंदर्गीकर यांनी पोलिसांचा घेरा ओलांडून मंत्र्यांवर शाई फेकली. शाई फेकण्याच्या घटनेपूर्वी आंदोलकांनी काळे झेंडे फडकावत भारतीय जनता पक्षाचा निषेध करत घोषणाबाजी केली.