Temple Reopen Issue: महाराष्ट्रात मंदिरं खुली केल्यास काँग्रेस-राष्ट्रवादी आपला पाठिंबा मागे घेतील का?; चंद्रकांत पाटील यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
दरम्यान महाराष्ट्रात मंदिरं खुली केली तर महाविकास आघाडीत कॉंग्रेस-NCP पाठिंबा काढून घेईल? असा सवाल भाजपा प्रदेधाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला विचारला आहे
मार्च महिन्यापासून महाराष्ट्रात आलेल्या कोरोना व्हायरस आणि त्यामुळे सुरु झालेले लॉकडाऊन याचा परिणाम महाराष्ट्रात धार्मिळ स्थळांवरही झाला. ज्याचा परिणाम राज्यातील मंदिरं गेली 7 महिने बंद आहेत. याच पार्श्वभूमीवर ही मंदिरं आता खुली करावीत या मागणी साठी भाजप नेत्यांनी राज्यातील अनेक जिल्ह्यांत आज आंदोलन केली. महाराष्ट्रातील अनेक मंदिरांबाहेर भाजप कार्यकर्ते साधू-संतांसोबत एकत्र येऊन आंदोलन केली. यात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी राज्य सरकारवर टिका करत मुख्यमंत्र्यावर निशाणा साधला आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी 'हिंदुत्त्वा'चा मुद्दा छेडत मंदिरं खुली करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना पत्र लिहल्यानंतर प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली आहे. दरम्यान महाराष्ट्रात मंदिरं खुली केली तर महाविकास आघाडीत कॉंग्रेस-NCP पाठिंबा काढून घेईल? असा सवाल भाजपा प्रदेधाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला विचारला आहे
राज्यातील मंदिरं तातडीने उघडावीत या मागणीसाठी चंद्रकांत पाटील शिर्डी येथे लाक्षणिक उपोषणाला बसले होते. त्यावेळी त्यांनी 'राज्यपाल हे नागरिक नाहीत का, हिंदू नाही का?' त्यांना जर सर्व मुद्द्यांवर बोलण्याचा अधिकार आहे तर प्रश्न विचारण्याचा अधिकार का नाही? असा सवाल चंद्रकांत पाटलांनी उपस्थित केला. मंदिरं पुन्हा उघडी केल्यास काँग्रेस-राष्ट्रवादी आपला पाठिंबा काढून घेतील का असा सवाल त्यांनी अप्रत्यक्षरित्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला आहे.
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा सांगणाऱ्या उद्धव ठाकरे यांचे हिंदुत्व प्रेम बेगडी आहे अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. एवढंच नाही तर संत, महंत, वारकरी मंडळींच्या संयमाची आणखी परीक्षा न पाहता महाआघाडी सरकारने राज्यातील मंदिरे आणि अन्य धर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडण्यास त्वरित परवानगी द्यावी. संत, महंत, वारकरी संप्रदायातील मंडळींवर मंदिरांत जबरदस्तीने जाण्याची वेळ आणू नका, असा इशारा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी राज्य सरकारला दिला.
राज्यात आज ठिकठिकाणी धार्मिक स्थळे पुन्हा खुली करावीत या मागणीसाठी भाजपकडून आंदोलने करण्यात आली.