Chandni Chowk Bridge Demolition: चांदणी चौकातील पूल 18 सप्टेंबरला होणार जमीनदोस्त; आजपासून वाहतूक बंद

Edifice engineering कंपनीकडून चांदणी चौकामधील पूल पाडला जाणार आहे.

Bridge | Pixabay.com

पुण्यात (Pune) वाहतूक कोंडीला कारणीभूत असलेला चांदणी चौकामधील पूल (Chandni  Chowk  Bridge) अखेर 18 सप्टेंबरला जमीनदोस्त होणार आहे. या कामाच्या पूर्वतयारीसाठी आता आज (13 सप्टेंबर) पासून त्याच्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. पुणेकरांना वाहतूकीसाठी काही पर्यायी मार्ग वापरण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

Edifice engineering कंपनीकडून पूल पाडला जाणार आहे. सध्या या पूलामध्ये काही ठिकाणी होल करून त्यामध्ये स्फोटकं भरली जाणार आहेत. अवघ्या 8-10 सेकंदामध्ये हा पूल पाडला जाईल त्यानंतर कोसळलेला पूलाचा मलबा साफ करण्यासाठी 8-10 तास काम केले जाणार आहे. हे देखील नक्की वाचा: Pune: पुणेकरांना मिळणार दिलासा; लवकरच काढली जाणार देहूरोड-चांदणी चौक रस्त्याची निविदा, नितीन गडकरी यांची माहिती .

पुण्यात सध्या एनडीए कडून मुळशी कडून पाषाण, बावधन, कोथरूड आणि वारजेकडे जाणारी वाहतूक नव्याने बांधण्यात आलेल्या फ्लायओव्हर क्रमांक 1 वरून वळवण्यात आली आहे. तर मुंबई कडे जाणारी वाहतूक फ्लायवे क्रमांक 7 वरून फ्लायओव्हर क्रमांक 3 मार्गे वळवली जाणार आहे. कोथरूड ते मुंबई वाहतूक कोथरूड भुयारी मार्गाने वेद विहारकडे जाणार आहे आणि कोथरूडकडून सातारा, वारजेकडे जाणारी वाहतूक वेदविहार सर्व्हिस रोडवरील शृंगेरी मठाजवळ महामार्गावरून वळवण्यात आली आहे. यामुळे पुण्यात आता दीड- दोन किमी वळसा घालूस चाककांना आपली वाहनं चालवावी लागत आहेत.