Pune: पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर आणि शनिवारवाड्यात घातपाताची शक्यता, सुरक्षा यंत्रणांकडून खबरदारीच्या सुचना
सुरक्षेअभावी शनिवारवाडा आणि दगडूशेठ हलवाई गणपती मंदीर या दोन्ही ठिकाणांवर सहज घातपात होवू शकतो अशी शक्यता सुरक्षा यंत्रणांकडून दर्शवण्यात आली आहे.
तुम्ही पुणेकर (Pune) असाल किंवा एकदा तरी पुण्यात गेलेले असाल तर असं कधीचं होणार नाही की तुम्ही श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर (Shrimant Dagdushethh Halwai Ganpati Temple) किंवा शनिवार वाड्याला (Shaniwar Wada) भेट दिली नसेल. पुण्याच्या या दोन्ही जागांना भेट देणं म्हणजे शास्त्र असतं ते. पण पुण्यातील हे दोन्ही ठिकाणं आता सुरक्षित राहिलेली नाही किंवा इथे गेल्यास सर्वसामान्यांना धाका आहे असं कुणी सांगितल्यास विश्वास बसणार नाही पण हो हे खरं आहे.. गर्दीची ठिकाणं असल्याने या ठिकाणी घातपाताची शक्यता सुरक्षा यंत्रणांनी वर्तवली आहेत. पोलिसांकडून महापालिका आयुक्तांना अहवाल देण्यात आला आहे. तरी या दोन्ही ठिकाणांवर खबरदारीच्या सुचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. सुरक्षेअभावी या दोन्ही ठिकाणांवर सहज घातपात होवू शकतो अशी शक्यता सुरक्षा यंत्रणांकडून दर्शवण्यात आली आहे.
गणपतीच्या मुख दर्शनासाठी वापरण्यात येणारी सध्याची कडक काचेची खिडकी ऐवजी बुलेटप्रूफ काच (Bullet proof Glass) वापरण्यात यावा अशा सुचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहे. तसेच सण-उत्सवाच्या वेळी मंदिरात अतिरिक्त सुरक्षा कर्मचारी तैनात करावी. मंदीर परिसराच्या आजूबाजूच्या इमारतींमध्ये राहणाऱ्या भाडेकरूंची नियमितपणे तपासणी करणे गरजेचे परिसरात अग्निशमन संबंधित उपकरणं वाढवण्यात आवश्यक असल्याचंही या सर्वेक्षणातून पुढे आले आहे. मंदित येणाऱ्या भक्तांचे इलेक्ट्रिकल ऑडिट (Electrical Audit) करणं महत्वाचं आहे.नियमित सुरक्षिततेसाठी तसेच अत्यावश्यकतेसाठी एक विशेष नियमावली तयार करण्यात यावी, अशा सुचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. (हे ही वाचा:- Pune Aero Mall: अखेर पुण्यतील बहूचर्चित एरो मॉलच्या उद्घाटनाचा मुहूर्त ठरला, पुणे विमानतळ प्राधिकरणाकडून अधिकृत घोषणा)
शनिवारवाडाच्या बाहेरील परिसरात दुकानदार कचरादेखील टाकतात त्यामुळे अशा दुकानांना परवानगी देऊ नका, अशी मागणीदेखील करण्यात आली आहे. रस्त्यावर दुकान लावण्याच्या बहाण्याने मोठी दुर्घटना घडू शकते तसेच परिसरातील घाणीचं साम्राज्य वाढत असल्याने प्रशानसाकडून दगडूशेठ हलवी मंदिर देवस्थान आणि शनिवारवाडा प्रशासनाला विशेष सुचना जारी करण्यात आल्या आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)