Centralised Admission Process FYJC 2022-23: 11वी प्रवेशप्रक्रियेचं वेळापत्रक जारी; 30 मे पासून भरता येणार भाग 1
त्यापूर्वी कॉलेजच्या नोंदणीची प्रक्रिया सुरू होणार आहे
जून महिन्यात यंदा राज्य शिक्षण मंडळ 10वी,12वीचा निकाल लावणार आहेत. त्यानंतर 11वी प्रवेशाची लगबग सुरू होणार आहे. यंदा 11वी प्रवेशप्रक्रियेमध्ये (FYJC Admission) अर्जाचा भाग 1 भरण्यासाठी 30 मे पासून सुरू होणार आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी त्याबद्दल माहिती दिली आहे. महाराष्ट्रामध्ये मुंबई महानगर क्षेत्र, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महापालिका क्षेत्रात केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली जाते.
11वी प्रवेशप्रक्रियेत भाग 1 भरण्यासाठी 23-27 मे दरम्यान सराव करता येणार आहे. त्यापूर्वी कॉलेजच्या नोंदणीची प्रक्रिया सुरू होणार आहे. हे देखील नक्की वाचा: FYJC Mock Admission प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकात बदल 23 मे नंतर सुरू होणार अर्ज प्रक्रिया .
वर्षा गायकवाड ट्वीट
11वी प्रवेशासाठी नोंदणी सरावाकरिता 23-27 मे चा कालावधी असेल. त्यानंतर 30 पासून पासून ऑनलाइन नोंदणी व प्रवेश अर्ज भाग १ भरणे लॉगइन आयडी आणि पासवर्ड मिळवता येईल. फॉर्मचा भाग 2 हा दहावीच्या निकालानंतर भरता येणार आहे.अद्याप 10वी निकालाची तारीख जाहीर झालेली नाही पण 20 जून पूर्वी निकाल लावण्याचा बोर्डाचा प्रयत्न आहे.