IPL Auction 2025 Live

Central Railways Mega Block: रविवार, 27 फेब्रुवारी 2022 रोजी मध्य रेल्वेचा मेगा ब्लॉक; जाणून घ्या लोकल गाड्यांची स्थिती

तसेच ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवादेखील उपलब्ध असतील

Mumbai Local | Representational Image | (Photo Credits: PTI)

मध्य रेल्वे (Central Railways), मुंबई विभाग रविवार, 27 फेब्रुवारी 2022 रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी त्याच्या उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक (Mega Block) चालवेल. यामध्ये सीएसएमटी ते विद्याविहार अप आणि डीएन स्लो मार्गावर सकाळी 10.55 ते दुपारी 3.55 पर्यंत मेगा ब्लॉक असेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 10.48 ते दुपारी 3.49 या वेळेत सुटणाऱ्या डाऊन स्लो गाड्या  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन फास्ट मार्गावर वळवण्यात येईल. या गाड्या मशीद, सँडहर्स्ट रोड, चिंचपोकळी, करी रोड, विद्याविहार या स्थानकांवर थांबणार नाहीत. पुढे त्या डाऊन स्लो लाईनवर पुन्हा वळवल्या जातील.

सकाळी 10.41 ते दुपारी 3.52 पर्यंत घाटकोपरहून सुटणाऱ्या अप स्लो गाड्या विद्याविहार ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान विद्याविहार, करी रोड, चिंचपोकळी, सँडहर्स्ट रोड आणि मस्जिद येथे अप फास्ट मार्गावर वळवण्यात येतील.

पनवेल-वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 4.05 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असेल. यामध्ये ठाणे-वाशी/नेरुळ आणि बेलापूर/नेरुळ-खारकोपर सेवा प्रभावित होणार नाहीत.

सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 वाजेपर्यंत पनवेलहून सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईहून सकाळी 9,45 ते दुपारी 3.12 या वेळेत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 वाजेपर्यंत पनवेलवरून ठाण्याकडे जाणाऱ्या अप ट्रान्सहार्बर मार्गावरील गाड्या आणि ठाण्यावरून पनवेलकडे जाणाऱ्या डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील गाड्या सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत रद्द असतील.

या मेगाब्लॉक कालावधीत बेलापूर ते खारकोपर/नेरुळ दरम्यानच्या उपनगरीय रेल्वे सेवा वेळापत्रकानुसार धावतील. तसेच ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवादेखील उपलब्ध असतील. या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-वाशी दरम्यान विशेष उपनगरीय गाड्या धावतील. (हेही वाचा: Curfew in Mumbai: बृहन्मुंबई हद्दीत 8 मार्च 2022 पर्यंत जमावबंदीचे आदेश जारी)

दरम्यान, ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीचे काम करण्यासाठी, वसई रोड यार्ड येथील अप आणि डाऊन दिवा मार्गावर 27/28 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 1 ते पहाटे 3.30 पर्यंत अडीच तासांचा मोठा जंबो ब्लॉक असणार आहे. त्यामुळे, रविवारी पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय विभागात दिवसा ब्लॉक नसेल.