कोयना, प्रगती एक्सप्रेस पुढील दहा दिवस घाटमार्गावरील तांत्रिक-दुरुस्तीच्या कामामुळे रद्द
या एक्सप्रेसच्या घाटमार्गावरील तांत्रिक आणि दुरुस्तीच्या कामामुळे हा निर्णय रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.
मध्य रेल्वेकडून (Central Railway) चालवण्यात येणाऱ्या कोयना, प्रगती एक्सप्रेस पुढील दहा दिवसांसाठी रद्द करण्यात आल्या आहेत. या एक्सप्रेसच्या घाटमार्गावरील तांत्रिक आणि दुरुस्तीच्या कामामुळे हा निर्णय रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. तसेच या दोन एक्सप्रेससह अन्य लांब पल्ल्याच्या गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. तर मुंबई-कोल्हापुर कोयना एक्सप्रेस पुणे येथून सोडण्यात येणार आहेत. काही गाड्यांचे मार्ग ही बदलण्यात आले असून त्याची माहिती रेल्वे प्रशानाने दिली आहे.
राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे घाट क्षेत्रामधील काही ठिकाणी दरड कोसळ्याने रेल्वेमार्गावर मोठे नुकसान झाले आहे. तसेच भर पावसातही रेल्वेमार्गावर दुरुस्तीची कामे करण्यात आली. परंतु अद्याप काही महत्वाची कामे शिल्लक असून ती आता पुढील दहा दिवसात करण्यात येणार आहेत. प्रगती एक्सप्रेस 15 ऑक्टोंबरला रद्द करण्यात आली आहे. तर पुणे-भुसावळ-पुणे ही गाडी 5 ते 15 ऑक्टोंबर दरम्यान दौंड- मनमाड या मार्गाने धावणार आहे.(Megablock 6th October 2019: मध्य, पश्चिम, हार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगाब्लॉक; पहा वेळापत्रक)
मध्य रेल्वे ट्वीट:
कोल्हापुर- मुंबई कोयना एक्सप्रेस 14 ऑक्टोंबर पर्यत पुण्यापर्यंतच धावणार आहे. तर मुंबई-पुणे दरम्यान गाडी रद्द करण्यात आली आहे. हुबळी-मुंबई-हुबळी 5 ते 14 ऑक्टोंबर, हैदराबाद-मुंबई-हैदराबाद ही गाडी 7 ते 15 ऑक्टोंबर, नांदेड-पनवेल-नांदेड 6 ते 15 ऑक्टोंबर या गाड्या फक्त पुण्यापर्यंतच सुरु राहणार आहेत.