Ganeshotsav Special Local Trains: गणेशोत्सवानिमित्त हार्बर, मेन लाईन वर धावणार रात्रीच्या वेळेस 22 विशेष ट्रेन्स; पहा वेळापत्रक

अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने मेन लाईनवर 18 आणि हार्बर लाईनवर 4 अशा एकूण 22 विशेष रात्रीच्या उपनगरीय गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. परतीच्या प्रवासाचे नियोजन करण्यासाठी प्रवाशांनी वेळापत्रक तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Ganeshotsav Special Local Trains: गणेशोत्सवानिमित्त हार्बर, मेन लाईन वर धावणार रात्रीच्या वेळेस 22 विशेष ट्रेन्स; पहा वेळापत्रक

गणेशोत्सवाच्या (Ganeshotsav) काळात भाविकांची गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने विशेष उपनगरीय गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मेन लाईनवर 18 आणि हार्बर लाईनवर 4 अशा एकूण 22 विशेष रात्रीच्या गाड्या सोडण्यात येणार असून, या गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई आणि कल्याण/ठाणे/पनवेल दरम्यानच्या सर्व स्थानकांवर थांबणार आहेत. 23/24, 24/25 आणि 25/26 सप्टेंबर दरम्यान या विशेष लोकल चालवल्या जाणार आहे. दरम्यान यंदा 25 सप्टेंबरला अनंत चतुर्दशी दिवशी अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे बाप्पा भाविकांचा निरोप घेणार आहेत. मुंबई लोकल सोबत मेट्रो देखील रात्री उशिरापर्यंत प्रवाशांच्या सेवेत असणार आहे. नक्की वाचा: गणेशोत्सवादरम्यान मुंबई मेट्रोची अ‍ॅक्वा लाईन 14 ते 25 सप्टेंबरपर्यंत मध्यरात्रीपर्यंत धावणार .  

मेन लाईनवरील डाऊन गाड्यांचे वेळापत्रक

23/24, 24/25 आणि 25/26 सप्टेंबर या तीन रात्री खालील विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत:

  • सीएसएमटी-कल्याण विशेष 1: सीएसएमटी येथून पहाटे 1.40 वाजता सुटून कल्याणला 3.10 वाजता पोहोचेल.
  • सीएसएमटी-ठाणे विशेष 1: सीएसएमटी येथून पहाटे 2.30 वाजता सुटून ठाण्याला 3.30 वाजता पोहोचेल.
  • सीएसएमटी-कल्याण विशेष 3: सीएसएमटी येथून पहाटे 3.24 वाजता सुटून कल्याणला 5.00 वाजता पोहोचेल.

मेन लाईनवरील अप गाड्यांचे वेळापत्रक

23/24, 24/25 आणि 25/26  या तीन रात्री खालील गाड्या उलट दिशेने धावणार आहेत:

  • कल्याण-सीएसएमटी विशेष 2: कल्याण येथून रात्री 12.05 वाजता सुटून सीएसएमटीला पहाटे 1.30 वाजता पोहोचेल.
  • ठाणे-सीएसएमटी विशेष 2: ठाणे येथून पहाटे 1.00 वाजता सुटून सीएसएमटीला 2.00 वाजता पोहोचेल.
  • ठाणे-सीएसएमटी विशेष 4: ठाणे येथून पहाटे 2.00 वाजता सुटून सीएसएमटीला 3.00 वाजता पोहोचेल.

हार्बर लाईनवरील गाड्यांचे वेळापत्रक

25/26 आणि 26/27 सप्टेंबर या दोन रात्री हार्बर लाईनवर खालील विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत:

डाऊन दिशा:

  • सीएसएमटी-पनवेल विशेष 1: सीएसएमटी येथून पहाटे 1.30 वाजता सुटून पनवेलला 2.45 वाजता पोहोचेल.
  • सीएसएमटी-पनवेल विशेष 3: सीएसएमटी येथून पहाटे 2.35 वाजता सुटून पनवेलला 4.05 वाजता पोहोचेल.

अप दिशा:

  • पनवेल-सीएसएमटी विशेष 1: पनवेल येथून पहाटे 1.00 वाजता सुटून सीएसएमटीला 2.10 वाजता पोहोचेल.
  • पनवेल-सीएसएमटी विशेष 3: पनवेल येथून पहाटे 1.45 वाजता सुटून सीएसएमटीला 3.05 वाजता पोहोचेल.

मध्य रेल्वेकडून प्रवाशांना आवाहन

मध्य रेल्वेने प्रवाशांना परतीच्या प्रवासाचे योग्य नियोजन करण्यासाठी वरील वेळापत्रक नीट तपासण्याचे आवाहन केले आहे. गणेशोत्सवाच्या मिरवणुका आणि विसर्जन सोहळ्यांना उपस्थित राहणाऱ्या भाविकांसाठी या विशेष गाड्या मोठा दिलासा ठरणार आहेत, कारण रात्री उशिरापर्यंत घरी परतणाऱ्या प्रवाशांची गैरसोय यामुळे टळणार आहे.

(The above story first appeared on LatestLY on Sep 19, 2026 11:52 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).