मुंबई: मध्य रेल्वे मार्गावर तांत्रिक बिघाड; माटुंगा-परळ दरम्यान ट्रेन्सचा खोळंबा
मध्य रेल्वे मार्गावर तांत्रिक बिघाड झाल्यामुळे सीएसटीएमकडे जाणारी लोकल सेवा ठप्प झाली आहे.
मध्य रेल्वे (Central Railway) मार्गावर तांत्रिक बिघाड झाल्यामुळे सीएसटीएमकडे जाणारी लोकल सेवा ठप्प झाली आहे. त्यामुळे परळ ते माटुंगा (Paral-Matunga) दरम्यान 5-6 लोकल एका मागोमाग एक थांबल्या आहेत. मात्र लोकलसेवा ठप्प झाल्याचे नेमके कारण अद्याप समजलेले नाही.
मध्य रेल्वे मार्गावरील वाहतुकीच्या खोळंब्यामुळे प्रवाशांना भर उन्हात नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
रेल्वे वाहतूक खोळंबल्याची आजच्या दिवसातील ही दुसरी घटना असून काही वेळापूर्वी बेलापूर-सीएसएमटी लोकल मुंबई सीएसएमटी स्थानकात बफरला धडकल्याने हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र या अपघातात कोणताही अनुचित प्रकार न घडल्याने रेल्वेसेवा काही काळाने पूर्ववत करण्यात आली.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Digital Lounge At Mumbai Central Station: मुंबई सेंट्रल स्टेशनवर सुरु झाले भारतीय रेल्वेचे देशातील पहिले डिजिटल लाउंज; मिळणार स्थानकावर बसून काम करण्यासाठी Co-Working जागा, जाणून घ्या वैशिष्ठ्ये
Mumbai Mega Block Update: रविवारी मध्य रेल्वेकडून कल्याण ते ठाणे दरम्यान मेगाब्लॉकची घोषणा; देखभालीच्या कामासाठी घेण्यात येणार ब्लॉक
Anti-Terror Operations In Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये 48 तासांत दोन विविध कारवाईत लष्कराने कसे घातले सहा दहशतवाद्यांना कंठस्नान
Railway Recruitment Board NTPC Exam 2025 Dates Announced: रेल्वे भरती मंडळाच्या एनटीपीसी परीक्षेच्या 2025 च्या तारखा जाहीर
Advertisement
Advertisement
Advertisement