सायन - माटुंगा दरम्यान रूळाला तडे, मध्य रेल्वेची वाहतूक 15-20 मिनिटं उशिराने

मध्य रेल्वेच्या सायन - माटुंगा (Sion - Matunga) स्थानकादरम्यान रेल्वे रूळाला तडे गेल्याने वाहतुक विस्कळीत झाली आहे.

Mumbai Local (Photo Credit : PTI)

Central Railway :  मुंबईकर चाकरमान्यांच्या गुरूवारची सकाळ मध्य रेल्वेच्या (Central Railway) प्रवाशांसाठी डोकेदुखीचा ठरला आहे. आज सकाळी मध्य रेल्वेच्या सायन - माटुंगा (Sion - Matunga) स्थानकादरम्यान रेल्वे रूळाला तडे गेल्याने वाहतुक विस्कळीत झाली आहे. चाकरमान्यांच्या कामाच्या वेळेमध्येच मुंबईकडे येणार्‍या रेल्वेमार्गामध्ये हा बिघाड झाल्याने अनेकांना आज लेटमार्क लागण्याची शक्यता आहे.

सध्या रेल्वे प्रशासनाकडून मध्य रेल्वेची वाहतूक पुर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र तरीदेखील

ट्रेन किमान 15-20 मिनिटं उशिराने धावत आहेत. मुंबईत सकाळच्या वेळेस चाकरमान्यांची गर्दी अधिक असते अशावेळेस वेळापत्रक कोमडल्याने प्रवाशांची रेल्वे स्थानकांवर गर्दी झाली आहे तसेच गाड्यांमध्येही मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.