परळ-दादर दरम्यान रेल्वे रुळाला तडे; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
आज सकाळी मुंबईची लाईफलाईन असलेली लोकलसेवा काहीशी विस्कळीत झाली आहे.
आज (बुधवार, 30/1/2019) सकाळी मुंबईची लाईफलाईन असलेली लोकलसेवा काहीशी विस्कळीत झाली आहे. परळ-दादर दरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्याने मध्य रेल्वेची (Central Railway) वाहतूक विस्कळीत झाली आहे. ठाण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत झाली असून धीम्या मार्गावरील वाहतूक जलद मार्गावर वळवण्यात आली आहे. त्यामुळे कामासाठी बाहेर पडलेल्या चाकरमान्यांना काहीसा त्रास सहन करावा लागत आहे.
परळ-दादर स्थानकादरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्याने मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या गाड्याही उशिराने धावत आहेत. त्यामुळे सकाळच्या ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांचे चांगलेच हाल होत आहेत. (मुंबई-दिल्ली राजधानी एक्स्प्रेस आता दररोज धावणार; मध्य रेल्वेचा मोठा निर्णय)
काही दिवसांपूर्वी कुर्ला-सायन दरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Digital Lounge At Mumbai Central Station: मुंबई सेंट्रल स्टेशनवर सुरु झाले भारतीय रेल्वेचे देशातील पहिले डिजिटल लाउंज; मिळणार स्थानकावर बसून काम करण्यासाठी Co-Working जागा, जाणून घ्या वैशिष्ठ्ये
Mumbai Mega Block Update: रविवारी मध्य रेल्वेकडून कल्याण ते ठाणे दरम्यान मेगाब्लॉकची घोषणा; देखभालीच्या कामासाठी घेण्यात येणार ब्लॉक
Anti-Terror Operations In Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये 48 तासांत दोन विविध कारवाईत लष्कराने कसे घातले सहा दहशतवाद्यांना कंठस्नान
Rajnath Singh Visit at Bhuj Airbase: 'हा तर ट्रेलर होता, योग्य वेळी संपूर्ण चित्र दाखवेल'; भूज एअरबेसवर राजनाथ सिंह यांचे वक्तव्य
Advertisement
Advertisement
Advertisement