मुंबई: Coronavirus च्या पार्श्वभूमीवर केंद्रीय विद्यालयाच्या इयत्ता सहावी ते आठवीच्या परीक्षा रद्द
मुंबईतील CBSE च्या संघटनेने हा निर्णय घेतला आहे.
कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) पार्श्वभूमिवर सर्व शासकीय यंत्रणा सर्वोतोपरी प्रयत्न करत असून गर्दी टाळण्यासाठी 31 मार्चपर्यंत अनेक शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. यात CBSE मुंबईतील विभागाने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. केंद्रीय विद्यालयाच्या मुंबईतील (Mumbai) सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या असून त्यांना उत्तीर्ण करुन पुढील वर्गात पाठविण्यात येणार आहे. हा निर्णय कोरोना व्हायरसचे मुंबईत पसरणारे जाळे लक्षात घेता घेण्यात आला आहे. कोरोना व्हायरसने ब-यापैकी महाराष्ट्रात आपले बस्तान मांडले असून मुंबईतही कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.
या पार्श्वभूमीवर केंद्रीय विद्यालयांच्या सहावी ते आठवीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबईतील CBSE च्या संघटनेने हा निर्णय घेतला आहे. यात पुण्यातील काही शाळांनी तर घटक चाचणी आणि सहामाहीचे मार्क मिळवून मुलांना उत्तीर्ण करणार असल्याचे सांगितले आहे. मात्र यातही ज्यांना 'E' ग्रेड मिळाली आहे त्यांना ही परीक्षा द्यावी लागणार आहे असेही केंद्रीय विद्यालय मंडळाने सांगितले आहे.
हेदेखील वाचा- भारतात Coronavirus बाधितांचा आकडा 147 वर, महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण
सहावी ते आठवीतील सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करुन पुढील वर्गात पाठविण्यात येणार आहे. यापूर्वी केंद्रीय विद्यालयाच्या पहिली ते पाचवीच्या परीक्षा यापूर्वीच रद्द करण्यात आल्या होत्या. त्यावेळी सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांबाबत निर्णय घेण्यात आला नव्हता. CBSE च्या मुंबई विभागीय कार्यालयात झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.
या इयत्तेतील विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करुन पुढील इयत्तेत पाठविण्यात येणार आहे. केंद्रीय विद्यालयांसाठी याबाबत परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.
भारतात कोरोनाग्रस्त (Coronavirus) रुग्णांचा आकडा 147 वर जाऊन पोहोचला आहे. त्यातील तिघांचा मृत्यू झाला असून, हे रुग्ण दिल्ली, महाराष्ट्र आणि कर्नाटक मधील होते. सर्वात महत्त्वाची आणि चिंताजनक गोष्ट म्हणजे देशात महाराष्ट्र (Maharashtra) राज्यात सर्वाधिक रुग्ण असल्याचे आढळून आले आहे. महाराष्ट्रात हा 42 रुग्ण आढळून आल्याचे सर्वेक्षणात आढळून आले आहे.