Parsik Hill Car Accident: बेलापूर मध्ये पारसिक हिलवरून कार रुळावर कोसळली; हार्बर मार्गावर रेल्वे सेवा विस्कळीत
नवी मुंबईतील बेलापूर येथील पारसिक हिल परिसरातून एक कार गुरुवारी दुपारी रेल्वे रुळावर कोसळली. स्थानिक वृत्तांनुसार कारमधील तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याला रुग्णालयात दाखल केले आहे.
वरळीच्या कोस्टल रोड वर भरधाव वेगातील कारने तिघांचा बळी घेतल्याची घटना ताजी असताना आता नवी मुंबईमध्ये बेलापूर येथील पारसिक हिल (Parsik Hill) परिसरात गुरुवारी, २४ सप्टेंबर रोजी दुपारी एक कार रेल्वे रुळावर कोसळल्याची घटना समोर आली आहे. हा अपघात दुपारी ३ ते ३.३० वाजण्याच्या सुमारास घडला आहे. वृत्तांनुसार कारमधील तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मीडीया रिपोर्ट्सनुसार, या घटनेमुळे मार्गावरील अप आणि डाउन दोन्ही दिशांची वाहतूक ठप्प झाली. कारमुळे ओव्हरहेड वायर (ओएचई), विजेचे खांब किंवा रुळांचे नुकसान झाले आहे का, याची तपासणी रेल्वे प्रशासन करत आहे. नुकसान आढळल्यास दुरुस्तीसाठी वेळ लागू शकतो. मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, वाहन हटवण्याचे आणि सेवा पूर्ववत करण्याचे काम सुरू आहे. सेवा किती वेळ विस्कळीत राहील, याची अधिकृत माहिती अद्याप मिळालेली नाही.
पारसिक हिल वरून कार थेट रूळावर
A four-wheeler that plunged from Parsik Hill landed on the railway tracks between Belapur and Uran, disrupting train movement. One local train has been detained due to the incident. A young man is reportedly seriously injured.#NaviMumbai #NaviMumbaiNews #BreakingNews… pic.twitter.com/nqAnbkeKcM
— Abhishek Kumar Pathak (@ImAbhi5200) September 24, 2026
हार्बर रेल्वे वाहतुकीवर परिणाम
काही वृत्तांनुसार, या घटनेमुळे मार्गावरील अप आणि डाउन दोन्ही दिशांची वाहतूक ठप्प झाली. कारमुळे ओव्हरहेड वायर (ओएचई), विजेचे खांब किंवा रुळांचे नुकसान झाले आहे का, याची तपासणी रेल्वे प्रशासन करत आहे. नुकसान आढळल्यास दुरुस्तीसाठी वेळ लागू शकतो.
मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, वाहन हटवण्याचे आणि सेवा पूर्ववत करण्याचे काम सुरू आहे. सेवा किती वेळ विस्कळीत राहील, याची अधिकृत माहिती अद्याप मिळालेली नाही.
यंत्रणा घटनास्थळी
घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासन, स्थानिक पोलीस आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी पोहोचल्या. रुळावरील कार बाजूला करून मार्ग मोकळा करण्याचे काम सुरू आहे. अपघातात इतर कोणी जखमी झाले आहे का आणि एकूण हानी किती झाली आहे, याची माहिती रेल्वे आणि पोलीस गोळा करत आहेत.
(The above story first appeared on LatestLY on Sep 24, 2026 05:49 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

