विमानात महिलेची छेडछाड करणाऱ्या व्यापाराला पोलिसांकडून अटक
दिल्ली (Delhi) कडून मुंबई (MUmbai) येथे जाणाऱ्या विस्तारा एअरलाईन्स (Vistara Airlines) या विमानात एका 65 वर्षीय व्यक्तीने बाजूला बसलेल्या महिले सोबत छेडछाड करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे.
दिल्ली (Delhi)कडून मुंबई (MUmbai)येथे जाणाऱ्या विस्तारा एअरलाईन्स (Vistara Airlines) या विमानात एका 65 वर्षीय व्यक्तीने बाजूला बसलेल्या महिले सोबत छेडछाड करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी आरोपीला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
दिल्लीहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या विस्तारा एअरलाईन्समध्ये 41 वर्षीय महिला प्रवास करत होती. त्यावेळी तिच्या बाजूला बसलेल्या एका 65 वर्षीय अनिल कुमार मूलचंदानी या व्यापाऱ्याने तिला विचित्र पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. या व्यक्तीला दोन वेळा समज देऊन ही त्याने हे कृत्य सुरु ठेवले. शेवटी महिलेने संतप्त होऊन मूलचंदानी याची विमानातील कर्मचाऱ्यांकडे तक्रार केली. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी हा सर्व प्रकार त्यांच्या अधिकारांपर्यंत पोहचवल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली.
या प्रकरणी आरोपी मूलचंदानी याच्यावर आईपीसी सेक्शन 354 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच महिलेने वारंवार समज देऊन ही अशा पद्धतीची वागणूक केल्याने आरोपीवर लवकरात लवकर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jan 08, 2019 09:22 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

