Bungalow Allotment Of Ajit Pawar Faction Ministers: अजित पवार गटाच्या मंत्र्यांना बंगले वाटप, खात्यांवर अद्यापही घोडे अडले; वाचा संपूर्ण यादी
शपथ घेतलेल्या मंत्र्यांना खाते आणि दालन यासोबतच बंगले वाटपाबद्दलही प्रतिक्षा होती. अखेर खाते वाटप झाले नसले तरी, किमानपक्षी दालन आणि बंगलेही वाटप झाले.
Bungalow Allotment Of Ajit Pawar Faction Ministers: राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षात बंड करुन अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये समर्थकांसह प्रवेश केला. पहिल्याच फटक्यात स्वत:सह नऊ जणांचा मंत्री म्हणून शपथही घेतली. मंत्रीपदाची शपथ घेतली मात्र खातेवाटपावर अद्यापही घोडे अडले आहे. दरम्यान, खातेवाटप अद्याप बाकी असले तरी मंत्र्यांना बंगले आणि मंत्रालयातील दालन मात्र वाटप करण्यात आले. शपथ घेतलेल्या मंत्र्यांना खाते आणि दालन यासोबतच बंगले वाटपाबद्दलही प्रतिक्षा होती. अखेर खाते वाटप झाले नसले तरी, किमानपक्षी दालन आणि बंगलेही वाटप झाले.
कोणत्या मंत्र्याला कोणते दालन आणि बंगला मिळतो याबाबत उत्सुकताहोती. दरम्यान, सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मंत्र्यांना मिळालेले बंगले दालन याबाबत एक यादी खालील प्रमाणे. (हेही वाचा, Uddhav Thackeray On CM Eknath Shinde: अजित पवार यांच्यामुळे मिंदे यांच्या 'नाकी नऊ' आले; उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघात)
मंत्र्यांना मिळालेले बंगले
- छगन चंद्रकांत भुजबळ, मा. मंत्री ब-6 (सिध्दगड)
- हसन मियालाल मुश्रीफ, मा.मंत्री क-8 (विशालगड)
- दिलीप दत्तात्रय वळसे-पाटील, मा.मंत्री क-1 (सुवर्णगड)
- धनंजय पंडितराव मुंडे, मा. मंत्री क-6 (प्रचितगड)
- धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम, मा.मंत्री सुरुची-3
- अनिल भाईदास पाटील, मा.मंत्री सुरुची-8
- संजय बाबराव बनसोडे, मा.मंत्री सुरुची-18
कोणत्या मंत्र्यांना, कोणतं दालन मिळालं?
- छगन भुजबळ, मंत्री मंत्रालय मुख्य इमारत, 2 रा मजला, दालन क्र. 201 दक्षिण बाजू
- हसन मुश्रीफ, मंत्री मंत्रालय विस्तार इमारत, 4 था मजला, दालन क्र. 407
- दिलीप वळसे–पाटील, मंत्री मंत्रालय मुख्य इमारत, 3 रा मजला, दालन क्र. 303, उत्तर बाजू
- धनजंय मुंडे, मंत्री मंत्रालय विस्तार इमारत 2रा मजला, दालन क्र. 201 ते 204, 212
- धर्मराव बाबा आत्राम, मंत्री मंत्रालय विस्तार इमारत, 6 वा मजला, दालन क्र. 601, 602, 604
- आदिती तटकरे, मंत्री मंत्रालय मुख्य इमारत, 1 ला मजला, दालन क्र. 103, उत्तर बाजू
- अनिल पाटील, मंत्री मंत्रालय मुख्य इमारत, 4 था मजला, दालन क्र. 401, दक्षिण बाजू
- संजय बनसोडे, मंत्री मंत्रालय मुख्य इमारत, 3 रा मजला, दालन क्र. 301, दक्षिण बाजू
दरम्यान, राज्य मंत्रिमंडळ विस्तार लवकरच पार पडणार असून या विस्तारात उर्वरीत आमदारांना मंत्रिपदे दिली जाणार आहेत. हा विस्तार उद्याच पार पडेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, विधिमंडलातील प्रोटोकॉल विभागाला तयारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.