Pistol-Bullets Found in BMW at Mumbai Airport: मुंबई विमानतळावर बीएमडब्ल्यू कारमध्ये सापडल्या गोळ्या आणि पिस्तुल; पुण्यातील व्यक्तीला अटक

कार मालक, तुषार काळे (41, पुणे येथील रिअल इस्टेट ब्रोकर) याला शस्त्रास्त्र कायद्यान्वये अटक करण्यात आली असून त्याच्याकडून 38,000 रुपये जप्त करण्यात आले आहेत.

Pistol-Bullets | (Photo Credits: Pixabay)

Pistol-Bullets Found in BMW at Mumbai Airport: रविवारी पहाटे मुंबई शहराच्या देशांतर्गत विमानतळाबाहेर (Mumbai Airport) परवाना प्लेट नसलेल्या BMW मधून पाच जिवंत राऊंडसह विनापरवाना पिस्तूल (Pistol) जप्त करण्यात आले. कार मालक, तुषार काळे (41, पुणे येथील रिअल इस्टेट ब्रोकर) याला शस्त्रास्त्र कायद्यान्वये अटक करण्यात आली असून त्याच्याकडून 38,000 रुपये जप्त करण्यात आले आहेत.

तथापी, तुषार काळे यांने सांगितले की, त्याने युपीमधील एका व्यक्तीकडून बंदूक विकत घेतली होती. पहाटे 2.50 च्या सुमारास विमानतळाजवळील मल्टी लेव्हल कार पार्कमध्ये लायसन्स प्लेट नसलेले वाहन पाहून सुरक्षा अधिकारी सतीश पाशिलकर आणि अक्षय गोटेकर यांना संशयास्पद वाटल्याने त्यांनी कारची झडती घेतली. पोलिसांना कारच्या ग्लोव्ह बॉक्समध्ये यूएस बनावटीचे 7.65 कॅलिबरचे पिस्तूल सापडले. (हेही वाचा -Pimpri Chinchwad Accident: अज्ञात वाहनाच्या धडकेत ऑन ड्युटी पोलिस हवालदाराचा अपघाती मृत्यू)

डीसीपी (झोन 8) दीक्षित गेडाम यांनी सांगितले की, दोन सुरक्षा अधिकाऱ्यांना विमानतळावर एका बीएमडब्ल्यूमध्ये पाच गोळ्या असलेले यूएस बनावटीचे पिस्तूल सापडले. वाहन परवाना प्लेटशिवाय पार्किंगच्या ठिकाणी नेले जात होते. यानंतर त्यांनी याबद्दल विमानतळ पोलिसांना सूचना दिली. आम्ही अटक केलेल्या पुण्यातील तुषार काळेच्या मुंबई भेटीमागील हेतू तपासत आहोत, असंही गेडाम यांनी यावेळी नमूद केलं. (हेही वाचा - Andhra Pradesh Shocking Accident: कार- मोटरसायकलच्या धडकेत दुचाकीस्वार पडला कारच्या छतावर; चालकाने मृतदेह घेऊन चालवली 18 किमी गाडी)

रविवारी वांद्रे येथील अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराशी काळेचा संबंध असल्याचा संशय पोलिसांनी सुरुवातीला व्यक्त केला होता, ज्यामुळे अनेक वरिष्ठ आयपीएस अधिकारी आणि गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात भेट दिली. आतापर्यंत, तपासात अभिनेत्याच्या प्रकरणाशी कोणताही संबंध स्थापित झालेला नाही. चौकशीदरम्यान काळेने पोलिसांना सांगितले की, तो एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आहे.

दरम्यान, काळे यांच्याकडे एका पिशवीत 38 हजार रुपये रोख होते. त्याने दावा केला की, हे पिस्तूल यूपीमधील एका व्यक्तीकडून खरेदी केले होते. पुण्यातील त्याच्या मित्रांना आणि इतर लोकांना दाखवण्यासाठी त्याने ते कारमध्ये ठेवले होते. त्याने नुकतीच कार खरेदी केली होती आणि त्याला नोंदणी क्रमांक मिळाला होता. परंतु, तो फॅन्सी नंबर असलेली नंबर प्लेट मिळण्याची वाट पाहत होता, असंही एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितलं.