Buldhana and Amravati Accident: बुलढाणा आणि अमरावती येथे वेगवेगळे दोन अपघात, एकाच कुटुंबातील पाच जणांसह 11 ठार

यातील पहिला अपघात बुलढाणा (Buldhana Accident) जिल्ह्यातील सिंधखेडराजा (Sindkhed Raja) येथे घडला. तर दुसरा अपघात अमरावती (Amravati Accident) येथे घडला.

Accident | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Buldhana and Amravati Accident: महाराष्ट्रात घडलेल्या वेगवेगळ्या दोन अपघातांमध्ये 11 जणांचा मृत्यू झाला आहे. यातील पहिला अपघात बुलढाणा (Buldhana Accident) जिल्ह्यातील सिंधखेडराजा (Sindkhed Raja) येथे घडला. तर दुसरा अपघात अमरावती (Amravati Accident) येथे घडला. सिंधखेड राजा येथील बहुतांश अपघातग्रस्त हे पंढरपूर येथून विठ्ठलदर्शन करुन परतत होते. तर अमरावतीमधील अपघातातील नागरिक विवाहावरुन परतत होते. अमरावतीमध्ये घडलेल्या अपघाताच्या घटनेत एकाच कुटुंबातील पाच जण जागीच ठार झाले आहत.

सिंदखेडराजा येथे सहा जण ठार

एसटी बस आणि ट्रक यांच्या भीषण अपघातात सहा जण जागीच ठार तर 10 जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना मुंबई-नागपूर या जुन्या महामार्गावर सिंदखेडराजा येथे घडली. वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या वृत्तात 6 जण ठार आणि 10 जण जखमी झाल्याचे म्हटले आहे. मात्र, स्थानिक प्रसारमाध्यमांनी मृतांची संख्या अधिक असल्याचे म्हटले आहे. एसटी आणि ट्रक ही दोन्ही भरधाव वाहने एकमेकांवर आदळल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी तातडीने दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने मदत आणि बचाव कार्य वेगाने राबविण्यात आले. सर्व अपघातग्रस्तांना बुलढाणा येथील सिंधखेडराजा येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघात घडलेल्या वाहनात पंढरपूर येथे विठ्ठलदर्शनासाठी गेलेल्या भाविकांचा समावेश अधिक आहे. (हेही वाचा, Palghar: पालघरमध्ये मोटारसायकल आणि कारच्या धडकेत 2 ठार)

अमरावती येथील अपघातात एकाच कुटुंबाती पाच ठार

अमरावती येथील दर्यापूर अंजनगाव मार्गावर असलेल्या लेगगावजवळ झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील 5 जण ठार झाले आहेत. तर, सात जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना रात्री आकरा वाजणेच्या सुमारास घडली. नातेवाईकाच्या लग्नाहून परतत असताना एकाच कुटुंबातील 12 जण एकाच वाहनातून प्रवास करत होते. अशा वेळी त्यांचे वाहन अंजनगाव सुरजी येथे आले असता त्याला अपघात घडला. रस्त्यावरुन जाताना पाठिमागून आलेल्या वाहनाने जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. अपघात घडला तेव्हा दोघे जागीच ठार झाले. इतर तिघे रुग्णालयात उपचार घेताना त्यांचा मृत्यू झाला. इतर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.