Buldhana Road Accident: गाढ झोपेत ट्रक दहा मजूरांच्या अंगावर; ४ जणांचा चिरडून मृत्यू, तिघे गंभीर जखमी

या अपघातात झोपलेल्या मजूरांना ट्रकने चिरडले आहे

Accident (PC - File Photo)

Buldhana Road Accident:  बुलढाणा (Buldhana) राष्ट्रीय महामार्गावर खामगाव- मलकापूर येथील वडनेर गावात एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात झोपलेल्या मजूरांना ट्रकने चिरडले आहे. 10 जणांच्या अंगावर ट्रक गेला. या अपघातात ४ जणांचा मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी झाले आहे. आणि तिघांना किरकोळ जखमा झाल्या आहे. जखमी मजुरांवर मलकापूर येथील शासकिय रुग्णालयात उपचार सुरु आहे. या अपघातामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक चालकाचं ट्रकवरील नियत्रंण सुटल्याने हा अपघात झाला आहे असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. अपघातामुळे काही काळ रस्त्यावर वाहतूक सेवा ठप्प होती. अपघातानंतर रस्त्यावर रक्ताचा सडा पडलेला आहे.पोलिस या घटने अंतर्गत तपास करत आहे. अपघाती मृत्यूची नोंद घेतली. अपघातात प्रकाश धांडेकर, पंकज जांभेकर, अभिषेक जांभेकर अशी मृतांची नावे आहे, तर एका मृत झालेल्याची ओळख अद्यापही पटली नाही. अपघात घडताच स्थानिकांनी घटनास्थळी गर्दी केली.

हे सर्व मजूर मध्य प्रदेशातून आलेले होते. महामार्गाच्या कामासाठी आले होते. सकाळच्यावेळी मजुर झोपलेल्या अवस्थेत असताना भरधाव ट्रकने चिरडलं. पाचच्या सुमारास ही घटना घडली.  तात्काळ स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी या सर्वांना मलकापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केलं आहे.