Mumbai Crime: मुंबईत बुधवारी पहाटे वरळीतील एका स्पामध्ये गुन्हेगारी रेकॉर्ड असलेल्या ५० वर्षीय व्यक्तीची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनाचा तपास सुरु आहे. गुरुसिध्दप्पा वाघमारे उर्फ चुलबुल पांडे यांची हत्या करण्यात आली. तो मैत्रिणीसोबत वरळी नाक्याजवळील 'सॉफ्ट टच स्पा'मध्ये होता त्यानंतर सायन रेल्वे स्थानकाजवळील अपर्णा बार अँड रेस्टॉरंटमध्ये मद्यपान करायला गेला होता. (हेही वाचा- कपलिंग प्रकियेदरम्यान रेल्वे कर्मचाऱ्याचा मृत्यू, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील घटना)
मिळालेल्या माहितीनुसार, मांजरेकर इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या स्पा, एलआप पापन मार्ग, वरळी नाका गेल्या सहा महिन्यांपासून बंद होता. पंरतु तरी देखील प्रवेश केला. हे दोघे स्पामध्ये व्यस्त असताना चॉपर आणि चाकूने सज्ज असलेल्या तीन अज्ञातांनी दरवाजा तोडला आणि सोफ्यावर झोपलेल्या वाघमारे यांच्यावर वारंवार हल्ला केला. या जीवघेण्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला.
दुपारी पोलिस ठाण्यात एक मृत देह आढळून आल्याचा फोन आला त्यावेळीस ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी सांगितले की, त्याच्यावर विलेपार्ले पोलीस ठाण्यात किमान पाच गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी मुख्य साक्षीदार असलेली महिलेला एका पुरुषासह ताब्यात घेण्यात आले आहे. अद्याप पोलिसांनी त्यांची ओळख उघड केलेली नाही. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पुढील तपासणी सुरु आहे.
पोलिसांनी सांगितले की, मृतदेहावर अनेक जखमा होत्या, त्याआधारे एफआयआर नोंदवला आहे. आरोपीला पकडण्यासाठी शोध सुरु आहे. आरोपीचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. पोलिस सीसीटीव्ही फुटेज तपासणार आहे.