Pune Rape: बहिण-भावाच्या पवित्र नात्याला काळीमा; सख्या भावानेच केला बहिणीवर बलात्कार, गरोदर राहिल्यानंतर झाला भांडाफोड
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit: Pixabay)

बहीण-भावाच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना पुण्यात घडली आहे. पुण्यातील घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त केला जात आहे. पिंपरी-चिंचवड (Pimpri- Chinchwad) येथे 21 वर्षीय भावानेच आपल्या बहिणीवर बलात्कार (Rape) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बलात्कारानंतर पीडित मुलगी 5 आठवड्यांची गरोदर राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने चिंचवड पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीला पुणे सत्र न्यायालयाने (Pune Sessions Court) सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी मूळची नांदेड येथील रहिवासी असून पोट भरण्याकरता चिंचवड येथील बिजलीनगरमध्ये आपल्या संपूर्ण कुटुंबासह भाड्याने घर घेऊन राहत आहेत. मात्र, 15 मे रोजी पीडित मुलगी हॉलमध्ये झोपली होती. त्यावेळी रात्री आसपास कोणी नाही हे पाहून पीडिताच्या सख्या भावानेच तिच्यावर बळजबरी करत बलात्कार केला. या गल्लीच्छ प्रकाराची वाच्यता केल्याने आपल्या कुटुंबाची बदनामी होईल, या भितीने पीडिताने घरी काही सांगितले नाही. परंतु, काही दिवसानंतर पीडित मुलगी गरोदर असल्याचे तिच्या आईच्या लक्षात आले. त्यानंतर आईने चौकशी केल्यावर हा घृणास्पद प्रकार तिने आईला सांगितला. त्यानंतर पीडित मुलीच्या आईने ताबडतोब चिंचवड पोलीस ठाण्यात जाऊन आरोपीविरोधात तक्रार दाखल केली आहे. हे देखील वाचा- Pune: दारु विक्रीचा परवाना मिळवून देण्याच्या नावाखाली एका व्यापाऱ्याची 40 लाखांची फसवणूक, पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना गेल्या पाच महिन्यापूर्वी घडली आहे. पीडित मुलगी गरदोर राहिल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक करून न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत आरोपीला तातडीने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.