IPL Auction 2025 Live

Mumbai Shocker: लाजिरवाणे कृत्य! प्रियकराने 15 महिन्यांच्या बाळाची आईसमोर केली निर्घृण हत्या, मृतदेह गटारात फेकून दिला

मात्र पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता प्रियकरानेच मुलाचा खून करून मृतदेह मुंबईच्या गटारात फेकल्याचे निष्पन्न झाले.

Baby | Representational image (Photo Credits: pxhere)

Mumbai Shocker: मुंबईतून (Mumbai) अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरात आईच्या ममतेला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. महिलेच्या प्रियकराने तिच्या 15 महिन्यांच्या बाळाची निर्घृण हत्या (Murder) केली. एवढचं नाही तर बाळाचा मृतदेह गटारात फेकून दिला. आश्चर्याची बाब म्हणजे ही घटना घडल्यानंतर आई आणि तिच्या प्रियकरावर पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याने सत्याची कबुली दिली. हे प्रकरण मुंबईतील जोगेश्वरी भागातील आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

आई आणि तिचा प्रियकर मुंबईत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. 15 महिन्यांच्या मुलाच्या हरवल्याची केस दाखल केली. पोलिसांनी सांगितले की, राजेश राणा (28 वर्षे) आणि रिंकी दास (23 वर्षे) असे या जोडप्याचे नाव असून ते मूळचे ओडिशाचे आहेत. तो 4 महिन्यांपूर्वीच आपल्या 15 महिन्यांच्या मुलाला घेऊन मुंबईत आला होता. हे दोघेही मुंबईतील जोगेश्वरी परिसरात राहत होते. (हेही वाचा - Laila Khan Murder Case: लैला खान आणि तिच्या कुटुंबीयांच्या हत्येप्रकरणी आरोपी परवेझ टाक याला फाशीची शिक्षा; मुंबई कोर्टाने 13 वर्षांनंतर दिला न्याय)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक दिवशी अचानक या जोडप्याने आपल्या मुलाची चोरी झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली. मात्र पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता प्रियकरानेच मुलाचा खून करून मृतदेह मुंबईच्या गटारात फेकल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा त्यांना कळाले की या दोघांनी (राजेश आणि रिंकी) यापूर्वी दुसऱ्या कुणाशी लग्न केले होते. रिंकीला पहिल्या लग्नापासून एक मुलगा झाला. यानंतर रिंकीचे तिच्या काकासोबत संबंध आले आणि ती गरोदर राहिली. काकांनी रिंकी दासशी लग्न करावं असं गाव पंचायतीने ठरवलं, पण मुलाला जन्म दिल्यानंतर रिंकी राजेशला भेटली आणि दोघेही मुंबईला पळून गेले.

रिंकीला आधीच मूल असणे राजेशला आवडत नव्हते. त्यामुळे राजेशने 15 महिन्यांच्या बाळाच्या तोंडावर व छातीवर जोरदार वार करून खून केला. यावेळी रिंकी दास तिथे उपस्थित होती. त्यानंतर दोघांनी मिळून पोलिसांना खोटी जबानी दिली. तपासादरम्यान पोलिसांना त्यांच्या कथेवर संशय आल्याने त्यांची कडक चौकशी करण्यात आली. त्यानंतर दोघांनीही आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.