Virar Shocker: आई ओरडली म्हणून 16 वर्षीय मुलाची आत्महत्या, विरारमधली घटना

मात्र बराच वेळ झाला तरी तो घरी परतलाच नाही. सोहम हा रात्री घरी न परतल्याने त्याच्या पालकांनी विरार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

Suicide Representational Image (Photo Credits: ANI)

सध्या तरुणाही कोणत्या गोष्टीमुळे कोणते पाऊल उचले हे काही सांगता येत नाही, पालघर जिल्ह्यातील विरारमध्ये देखील एक धक्कादायक घटना घडली आहे. या ठिकाणी आई ओरडली म्हणून 16 वर्षाय अल्पवयीन मुलाना जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलाने तलावत उडी घेत आत्महत्या केली आहे. सोहम चक्रवर्ती असे या मुलाचे नाव आहे. सोहम चक्रवर्ती हा अल्पवयीन मुलगा विरार पूर्वेच्या मनवेलापाडा येथील रामविला अपार्टमेंटमध्ये राहत होता. तसेच सोहम हा वसईतील एका कॉलेजमध्ये अकरावी कॉमर्सचं शिक्षण घेत होता.  (हेही वाचा -  Viagra Overdose: व्हायग्रा गोळ्यांचा डबल डोस जीवावर बेतला, तरुणाचा Heart Attack ने मैत्रिणीसमोरच मृत्यू)

सोहम चक्रवतीने सोमवारी क्लास बुडवुन मित्रांसोबत फिरायला गेला होता. ही गोष्ट घरी कळताच सोहमच्या आईने त्याला ओरडले आणि पुन्हा असे कधी न करण्यास बजावले. त्यामुळे सोहम हा रागात घराबाहेर निघून गेला होता. मात्र बराच वेळ झाला तरी तो घरी परतलाच नाही. सोहम हा रात्री घरी न परतल्याने त्याच्या पालकांनी विरार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी शोध सुरू असताना विरार पूर्वेच्या साईदत्तनगर येथील खदाणीच्या तलावात त्याचा मृतदेह आढळून आला. त्याने रागाच्या भरात तलावात उडी घेत आत्महत्या केल्याची माहिती विरार पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संजय चव्हाण यांनी दिली. या प्रकरणी विरार पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.