Amruta Fadnavis Threat Case: अमृता फडणवीस धमकी प्रकरणातील आरोपी अनिक्षा जयसिंघानीला मुंबई सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर
अनिक्षा ला 16 मार्च रोजी अटक करण्यात आली होती.
Amruta Fadnavis Threat Case: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला बुकी अनिल जयसिंघानी यांची मुलगी अनिक्षा जयसिंघानी (Aniksha Jaisinghani) हिला मुंबई सत्र न्यायालयाने (Mumbai Sessions Court) जामीन मंजूर केला आहे. अनिक्षा जयसिंघानीला 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. अनिक्षा ला 16 मार्च रोजी अटक करण्यात आली होती.
गेल्या आठवड्यात अनिक्षा आणि तिचा चुलत भाऊ निर्मल जयसिंघानी यांना गुजरातमधून अटक करण्यात आली होती. शुक्रवारी जयसिंघानी यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्यांनी लगेचच त्यांचे वकील मनन संघाई यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला. (हेही वाचा -Amruta Fadnavis Blackmailing and Threatening Case: डिझायनर Aniksha Jaisinghani ला अटक दुसरा आरोपी Anil Jaisinghani चा शोध सुरू)
सरकारी वकिलांनी सोमवारी उत्तर सादर करत जामीन अर्जाला विरोध केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर विशेष न्यायालयाचे न्यायाधीश डीडी अलमले यांनी अनिक्षाला जामीन मंजूर केला.
उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी अनिक्षा आणि तिचे वडिल अनिल जयसिंघानीविरुद्ध कट रचणे आणि खंडणी व भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदीनुसार आयपीसी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल जयसिंघानी विरोधात 17 खटले प्रलंबित आहेत.