IPL Auction 2025 Live

Nashik Oxygen Leak Tanker Incident: डॉ. झाकीर हुसेन रूग्णालयातील ऑक्सिजन गळती दुर्घटनेवर Bombay High Court ची Suo Moto याचिका ; महाराष्ट्र सरकारला उत्तर देण्याचे आदेश

मुंबई उच्च न्यायालयाने देखील Nashik Oxygen Leak Tanker Incident मध्ये पुढाकार घेउन स्यू मोटो याचिका दाखल केली आहे.

Mumbai High Court (Photo Credit: ANI)

महाराष्ट्रात नाशिक मध्ये काही दिवसांपूर्वी डॉ. झाकिर हुसेन रूग्णालयामध्ये (Dr Zakir Hussain Hospital) ऑक्सिजन गळतीमुळे 29 जणांचे जीव गेले. या हृद्य पिळवटून टाकणार्‍या घटने चे सार्‍याच स्तरात प्रतिसाद उमटले आहेत. सध्या मुख्यमंत्र्यांकडून या घटनेची दखल घेत सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर या प्रकरणात आता मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) देखील पुढाकार घेउन स्यू मोटो याचिका (Suo Moto Cognizance) दाखल केली आहे. या याचिकेमध्ये राज्य सरकारने आपली बाजू मांडावी असे आदेश बॉम्बे हाय कोर्टाकडून देण्यात आले आहेत. Oxygen Tank Leaks at Nashik: नाशिक दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना सरकारकडून 5 लाख रुपांची मदत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून घटनेच्या चौकशीचे आदेश, त्रिसदस्यीय समिती स्थापन.

21 एप्रिलला दुपारी नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनच्या टँकमध्ये अचानक गळती झाली. अवघ्या काही मिनिटांच्या वेळात होत्याचं नव्हतं झालं आणि व्हेंटिलेटर वर असणार्‍या रूग्णांचा हकनाक मृत्यू झाला. 30-34 मिनिटं ऑकसिजन पुरवठा खंडीत असल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली मात्र त्यानंतर आता पुढील चौकशीसाठी आणि नेमका दोष कुणाचा होता याबद्दल अधिक तपास सुरू आहे.

ANI Tweet

दरम्यान देशातील ऑक्सिजनच्या कमतरतेवरून अनेक राज्यांत रूग्णांच्या जीवाशी खेळ होत आहे. देशात कोविड रूग्णसंख्येमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. यावरूनच देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने देखील स्यु मोटो याचिका दाखल करत केंद्र सरकारला नोटीस जारी केली आहे. त्यामध्ये रेमडीसीवीर सह औषधांचा तुटवटा, ऑक्सिजनची कमतरता, बेडस साठी रूग्णांची, त्यांच्या नातेवाईकांची होणारी वाणवा तसेच लसीकरणाची परिस्थिती याबाबत देशाने राष्ट्रीय धोरण तयार करावं असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले आहेत.