INS Vikrant Case: नील सोमय्या अटकपूर्व जामीन मंजूर; आयएनएस विक्रांत प्रकरणी कोठोर कारवाई न करण्याचे कोर्टाचे निर्देश

आयएनएस विक्रांत ( INS Vikrant Corruption Case) प्रकरणी भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या ( Kirit Somaiya) यांच्या प्रमाणेच त्यांचा मुलगा नील सोमय्या (Neil Somaiya) यांनाही मुंबई उच्च न्यायालयाकडून (Mumbai High Court) दिलासा मिळाला आहे.

Kirit Somaiya, Neil Somaiya | | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

आयएनएस विक्रांत ( INS Vikrant Corruption Case) प्रकरणी भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या ( Kirit Somaiya) यांच्या प्रमाणेच त्यांचा मुलगा नील सोमय्या (Neil Somaiya) यांनाही मुंबई उच्च न्यायालयाकडून (Mumbai High Court) दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिलेल्या निर्देशात आयएनएस विक्रांत (INS Vikrant) प्रकरणी नील सोमय्या यांच्यावर तूर्तास तरी कोणत्याही प्रकारे कठोर कारवाई करण्यात येऊ नये, असे म्हटले आहेत.

नील सोमय्या यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार नसली तरी त्यांना पोलीस बोलावतील तेव्हा चौकशीला हजर राहून सहकार्य मात्र करावे लागणार आहे. या प्रकरणात नील सोमय्या यांना जरी अटक झाली तरी त्यांना 50 हजार रुपयांच्या जामीनावर त्यांची सूटका करण्यात यावी, असेही न्यायालयाचे निर्देश आहेत. कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार 25 ते 28 एप्रिल या काळात सकाळी 11 ते दुपारी 2 या कालावधीत नील यांना तपास अधिकाऱ्यापुढे चौकशीला उपस्थित राहण्याचे निर्देश आहेत. (हेही वाचा, Kirit Somaiya Video: तक्रारीनंतर किरीट सोमय्यांकडून व्हिडीओ शेअर करत थेट राज्य सरकारला आव्हान, पहा नक्की काय म्हणाले ?)

नील सोमय्या यांच्या आधी त्यांचे वडील किरीट सोमय्या यांनाही याच प्रकरणात न्यायालयाने दिलासा दिला आहे. दरम्यान, मुंबई पोलीसांकडून किरीट सोमय्या यांची चौकशी सुरु आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेना भवन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत किरीट सोमय्या यांनी आयएनएस बचाव मोहिमेत कोट्यवधी रुपये गोळा केले. तसेच हे पैस सरकारजमा न करता ते खासगी कामासाठी वापरले. मदत निधीतून आलेले पैसे किरीट सोमय्या यांनी आपला मुलगा नील सोमय्या यांच्या कंपनीत वळते केल्याचाही राऊत यांचा आरोप होता. या आरोपावरुन एका माजी सैनिकाने किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरुन मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल करुन कारवाई सुरु केली होती. दरम्यान, या प्रकरणात अटक होऊ शकते हे लक्षात येताच किरीट सोमय्या आणि त्यांच्या पुत्राने अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला.

ट्विट

किरीट सोमय्या यांच्या विरोधात संजय राऊत जोरदार आक्रमक झाले होते. आयएनएस बचावसाठी सोमय्या यांनी जमा केलेला पैसा मुलाच्या ''निकॉन इन्फ्रा' कंपनीत गुंतवला. आयएनएस विक्रांत हा देशवासियांच्या जिव्हाळ्याचा विषय असल्याने नागरिकांनीही विक्रांत बचावसाठी सढळ हाताने मदत केली. परंतू, तो पैसा विक्रांतसाठी वापरण्यातच आला नाही. यावरुन दाखल झालेल्या तक्रारीनंतर संजय राऊत यांनी 'बाप बेटे जेल जाएंगे' असे ट्विट कले होते. दरम्यान, सोमय्या पितापुत्रांना न्यायालयाकडून तूर्तास तरी दिलासा मिळाला आहे. त्यामुळे आगामी काळात काय घडते याबाबत उत्सुकता आहे.